ट्युनिशिया हल्ला; नऊ जण जेरबंद

By admin | Published: March 20, 2015 01:36 AM2015-03-20T01:36:19+5:302015-03-20T01:36:19+5:30

ट्युनिशियातील हल्ल्याशी थेट संबंध असलेल्या ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Tunisia attacks; Nine people laid dead | ट्युनिशिया हल्ला; नऊ जण जेरबंद

ट्युनिशिया हल्ला; नऊ जण जेरबंद

Next

ट्युनिस : ट्युनिशियातील हल्ल्याशी थेट संबंध असलेल्या ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी ट्युनिस येथील प्रसिद्ध बार्डो संग्रहालयावर बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २० विदेशी पर्यटकांसह २३ जण ठार झाले होते. दरम्यान, या हल्ल्याचा जगभरात निषेध होत आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे एएफपीचे वृत्त आहे.
हल्लेखोरांपैकी दोघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. यासीन लाबिदी आणि हतीम खाचनौली, अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, ट्युनिशियाचे अध्यक्ष बेजी कॅड एसेबसी यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराशी चर्चा केली. त्यानंतर सर्व मोठ्या शहरांत सुरक्षेसाठी लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मृतांपैकी १३ जणांची ओळख पटल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या हल्ल्यात एक पोलीसही ठार झाला. दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या हल्ल्याचा निषेध करीत मृतांप्रती शोक व्यक्त केला. जगभरातूनही याचा निषेध होत आहे.
नागरिकांचा मेणबत्ती मोर्चा
ट्युनिशियात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २३ लोक मरण पावल्यानंतर, नागरिकांनी आज गोळीबार झालेल्या बार्डो संग्रहालयावर मेणबत्ती मोर्चा काढला असून, अध्यक्षांनी दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अरब क्रांतीचे जन्मस्थान असणाऱ्या ट्युनिशियात झालेल्या या हल्ल्याचा जागतिक पातळीवर निषेध केला जात आहे.
ट्युनिशिया आता दहशतवादविरोधी युद्धात उतरला आहे, ही बाब नागरिकांनी समजून घेतली पाहिजे, असे अध्यक्ष
बेजी कॅड एसेबसी यांनी म्हटले आहे. त्यांनी बार्डो वस्तुसंग्रहालयात परदेशी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यासंदर्भात मृतांचे आकडे वेगवेगळे दिले जात आहेत. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ठार मारले असून, त्यांच्या सहकाऱ्याचा शोध अजूनही चालू आहे. (वृत्तसंस्था)

स्टॉकहोम : स्वीडनच्या गोथनबर्ग शहरातील एका उपाहारगृहात झालेल्या गोळीबारात अनेक लोक अडकले असून, दोन ठार झाले आहेत. गोथनबर्गच्या बिस्कोप्सगार्डन उपनगरात हा गोळीबार झाला. पोलीस प्रवक्ता उला ब्रेहम म्हणाल्या की, गोळीबारामागे कोणता उद्देश होता हे आता सांगणे घाईचे ठरेल; पण हल्लेखोर संघटनेशी संबंधित होते. ही घटना हा दहशतवादी हल्लाच असेल असे संकेत अद्याप मिळालेले नाहीत. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार दोन लोक स्वयंचलित शस्त्रे हाती घेऊन उपाहारगृहात शिरले. आत येताच त्यांनी गोळीबार सुरू केला. वार क्रोग ओच बार या हॉटेलमध्ये ही घटना घडली.

Web Title: Tunisia attacks; Nine people laid dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.