बर्फाच्या वादळाचे अमेरिकेत तांडव, एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद

By admin | Published: January 23, 2016 05:00 PM2016-01-23T17:00:09+5:302016-01-23T19:23:56+5:30

अमेरिकेच्या पूर्व किना-यावर गेल्या दोन दिवसांपासून बर्फाचे वादळ आले असून पूर्वेकडिल राज्यांवरती याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.

Turbidity of the snow storm in the United States, the power supply to one lakh households is closed | बर्फाच्या वादळाचे अमेरिकेत तांडव, एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद

बर्फाच्या वादळाचे अमेरिकेत तांडव, एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २३ - अमेरिकेच्या पूर्व किना-यावर गेल्या दोन दिवसांपासून बर्फाचे वादळ आले असून  पूर्वेकडिल राज्यांवरती याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. सध्या पडलेल्या बर्फाचा काही ठिकाणी पाच ते सहा इंचाचा थर निर्माण झाला असून वादळ गेल्यानंतर दोन फुटांपर्यंत बर्फ साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वादळामुळे सहा राज्यांमध्ये आणिबाणी घोषित करण्यात आली आहे, तर नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच ७००० विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहे. या वादळामुळे टेनेसी, नार्थ कॅरोलिना, केंटुकी राज्यांमध्ये या वादळामुळे झालेल्या अपघातात आठ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत.
 
- अमेरिकेच्या पूर्व किना-यावर गेल्या दोन दिवसांपासून जोनास हे बर्फाचे वादळ आले असून पूर्वेकडील राज्यांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.
 
- हिवाळी वादळ जोनास अमेरिकेच्या पूर्व किना-यावरील पाच कोटी लोकांचे जीवन असह्य करेल असा अंदाज आहे.
 
- या हिमवादळामुळे खेळांचे सामने, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
 
- अमेरिकेतल्या २० राज्यांमधील ८.५ कोटी नागरिकांना हिमवादळापासून गंभीर धोका असल्याच्या व प्राणहानीही होऊ शकते अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 
- अत्यंत बिकट परिस्थिती ओढवू शकते हे ओळखून नागरिकांनी मॉल्समधून मिळेल ते साहित्य घरी साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मॉलमध्ये पदार्थांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.
 
- या वादळाचा फटका विमानप्रवासाला बसला असून पूर्व किना-यावरील राज्यांमधील विमानांची असंख्य उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शुक्रवारी व शनिवारी मिळून जवळपास ६००० उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.
 
- जोनास या हिमवादळामुळे अमेरिकेतील पूर्व भागात आणिबामी जाहीर करण्यात आली आहे.
 
- नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
 
- वादळ गेल्यानंतर दोन फुटांपर्यंत बर्फ साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
- टेनेसी, नार्थ कॅरोलिना, केंटुकी राज्यांमध्ये या वादळामुळे झालेल्या अपघातात आठ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत.
 

Web Title: Turbidity of the snow storm in the United States, the power supply to one lakh households is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.