मॉडलने ऑनलाइन ऑर्डर केल्या हातबेड्या, मग बांधून करू लागली होती 'हे' काम; गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 03:23 PM2021-09-09T15:23:29+5:302021-09-09T15:23:40+5:30
क्रिस्टीना नोवित्स्का तिच्या घरातील एका खुर्चीवर बसलेली आढळून आली होती आणि तिचे हात मागे बांधलेले होते.
तुर्कीच्या बोडरममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका मॉडलने आपले हात बांधून सिनेमातील एका सीनची नक्कल केली. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. २५ वर्षीय क्रिस्टीना नोवित्स्का यावर्षी जानेवारीत आपल्या घरात मृत आढळून आली होती. आता कोर्टाने या केसवर सुनावणी केली आहे आणि केस बंद करण्याचा आदेश दिलाय.
पोलिसांना आधी होती हत्येची शंका
क्रिस्टीना नोवित्स्का तिच्या घरातील एका खुर्चीवर बसलेली आढळून आली होती आणि तिचे हात मागे बांधलेले होते. त्यासोबतच क्रिस्टीनाच्या तोंडात कपड्याचा बोळा भरलेला होता. हे सगळं बघता पोलिसांना आधी हत्येचा संशय झाला आणि त्यांनी तपास सुरू केला. पण तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून जे छोटे छोटे पुरावे सापडले त्यानंतर त्यांनी ही हत्या नसल्याचं सांगितलं.
सिनेमाच्या सीनच्या नक्कलमुळे गेला जीव
आता या केसप्रकरणी कोर्टाने निर्णय दिला आहे की, क्रिस्टीना नोवित्स्काने केविन स्पेसी आणि केट विंसलेटच्या २००३ मध्ये आलेल्या 'द लाइफ ऑफ डेविड गेल' (The Life Of David Gale) सिनेमातील एका सीनी नक्कल करून आपला जीव घेतला. सिनेमात अशाप्रकारचाच सीन दाखवण्यात आला होता.
कसा झाला खुलासा?
यूक्रेनीयन मॉडल क्रिस्टीना एका ट्रान्सलेटर आणि डान्स इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम करत होती. यावर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा ती बऱ्याच दिवसांपासून दिसली नाही तर शेजाऱ्यांनी याबाबत विचारणा केली. त्यानंतर मकान मालकानेही एक दुसरी चावी बनवत तिच्या घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना ती मृत आढळून आली.
सापडले महत्वाचे पुरावे
पॅरामेडिक्सने तिला चेक केलं आणि मृत्यूची घोषणा केली. नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. क्रिस्टीनाच्या मित्रानेही हत्येचा संशय व्यक्त केला होता. पण अधिकाऱ्यांना काही असे पुरावे सापडले, ज्यात हे सिद्ध होतं की, ही आत्महत्या होती. सर्वातआधी पोलिसांना आढळून आलं की, घर आतून बंद होतं आणि लोखंडी ग्रिलच्या खिडक्याही तुटल्या नव्हत्या.
स्वत: ऑर्डर केल्या होत्या हातबेड्या
पोलिसांना हेही दिसलं की, हातबेड्यांचा बॉक्स क्रिस्टीनाच्या डेड बॉडीजवळच पडला होता. नंतर समोर आलं की, मॉडलने तिच्या मृत्यूच्या चार दिवसआधी हातबेड्या ऑनलाइन ऑर्डर केल्या होत्या.
आत्महत्येप्रकरणी क्रिस्टीनाच्य आईचा जबाब महत्वपूर्ण ठरला. त्यांनी सांगितलं की, लॉकडाऊन दरम्यान ती तणावात होती आणि अॅंटी डिप्रेशन औषधे घेत होती. सोबतच तिला मायग्रेनची समस्याही होती. कोर्टाने सांगितलं की, याचा काहीच पुरावा नाही की, क्रिस्टीनाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं.