Turkey Earthquake: तुर्की, सिरीयाला आणखी हादरे बसणार; भूकंपांत आतापर्यंत 2310 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:46 PM2023-02-06T21:46:47+5:302023-02-06T21:49:06+5:30

मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आले असून भारतासह अनेक देशांनी मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तुर्कस्तानमध्ये सोमवारी तीन भूकंपामुळे घबराट पसरली.

Turkey Earthquake: 2310 people died inside Turkey, Syria; three time shake in 24 hours | Turkey Earthquake: तुर्की, सिरीयाला आणखी हादरे बसणार; भूकंपांत आतापर्यंत 2310 लोकांचा मृत्यू

Turkey Earthquake: तुर्की, सिरीयाला आणखी हादरे बसणार; भूकंपांत आतापर्यंत 2310 लोकांचा मृत्यू

Next

भूगर्भातील चार प्लेट्सवर वसलेला देश तुर्की आणि सिरियामध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार भूकंपाचा धक्का बसला. यानंतर तेथील इमारती पत्त्यासारख्या खाली कोसळल्या आहेत. यानंतर सायंकाळच्या सुमारास आणखी एक मोठा धक्का बसला. या भूकंपांत आतापर्यंत 2310 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १० हजार हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आले असून भारतासह अनेक देशांनी मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तुर्कस्तानमध्ये सोमवारी तीन भूकंपामुळे घबराट पसरली. सायंकाळच्या भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल एवढी होती. तुर्कस्तानमध्ये गेल्या २४ तासांतील हा तिसरा भूकंप आहे. तुर्कीला आणखी भूकंपाचे झटके बसणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

भूकंपामुळे 2818 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. आतापर्यंत 2470 लोकांना ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी तातडीची बैठक घेऊन भूकंपग्रस्तांना शक्य ती सर्व मदत देऊ केली आहे. 

सीरियातही भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. भूकंपामुळे सीरियातील अनेक शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. एकट्या सीरियात भूकंपामुळे ७८३ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. 

Web Title: Turkey Earthquake: 2310 people died inside Turkey, Syria; three time shake in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप