Turkey Earthquake: भीषण भूकंपामुळे तुर्की सीरियापासून 5 मीटर सरकला; नद्यांची दिशा बदलण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:51 PM2023-02-09T18:51:46+5:302023-02-09T18:51:53+5:30

Turkey Earthquake: तुर्कीचा बहुतेक भाग अॅनाटोलियन टेक्टोनिक प्लेटवर आहे, ही प्लेट सरकल्यामुळे भूकंप आला आहे.

Turkey Earthquake: Massive Earthquake Moves Turkey 5 Meters Off Syria; Fear of changing the direction of rivers | Turkey Earthquake: भीषण भूकंपामुळे तुर्की सीरियापासून 5 मीटर सरकला; नद्यांची दिशा बदलण्याची भीती

Turkey Earthquake: भीषण भूकंपामुळे तुर्की सीरियापासून 5 मीटर सरकला; नद्यांची दिशा बदलण्याची भीती

googlenewsNext


Turkey Earthquake Latest Update: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भीषण भूकंपामुळे हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या. आतापर्यंत 17 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देश तुर्कस्तानला मदत करत आहेत. दरम्यान, सीरियाच्या तुलनेत तुर्कस्तान पाच ते सहा मीटर सरकल्याचा दावा भूकंपशास्त्रज्ञांनी केला आहे. टेक्टोनिक प्लेट्समुळे ही घटना घडली आहे. 

तुर्कस्तानातील जमीन सरकण्याचे कारण समजून घेण्यासाठी त्याचे स्थान समजून घ्यावे लागेल. जग मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेले आहे. या प्लेट्सच्या खाली लाव्हा आहे. या प्लेट्स लाव्हांवर तरंगत राहतात आणि अनेक वेळा एकमेकांवर आदळतात. तुर्कीचा बहुतेक भाग अॅनाटोलियन टेक्टोनिक प्लेटवर आहे. ही प्लेट युरेशियन, आफ्रिकन आणि अरेबियन प्लेट्समध्ये अडकलेली आहे. जेव्हा आफ्रिकन आणि अरबी प्लेट्स सरकते, तेव्हा पृथ्वीच्या आतून ऊर्जा बाहेर पडते आणि तुर्कीध्ये भूकंप होतात. उत्तर अनाटोलियन फॉल्ट लाइनवर तुर्कीमध्ये सोमवारी भूकंप झाला.

इटलीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ. कार्लो डोग्लिओनी यांच्या मते, अॅनाटोलियन टेक्टोनिक प्लेट्स आणि अरेबियन प्लेट्स एकमेकांपासून 225 किलोमीटर दूर सरकल्या आहेत. त्यामुळे तुर्कस्तान आपल्या भौगोलिक ठिकाणापासून 10 फूट सरकले आहे. तसेच, प्लेट्समधील या बदलामुळे तुर्की सीरियापेक्षा 5 ते 6 मीटर म्हणजेच सुमारे 20 फूट खोलही झाला आहे. येत्या काही दिवसांत सॅटेलाइट इमेजमधून अचूक माहिती मिळणार आहे.

डरहम यूनिव्हर्सिटीमध्ये स्ट्रक्चरल जियोलॉजीचे प्रोफेसर डॉ. बॉब होल्ड्सवर्थ यांच्या मते, टेक्टोनिक प्लेट्सच्या अशा आडव्या हालचालीमुळे रस्ते, इमारती, बोरिंग, पाणी किंवा पेट्रोलच्या पाइपलाइन फुटू शकतात. यासोबतच नद्यांची दिशाही बदलू शकते. या तीव्र भूकंपाचे केंद्र तुर्कस्तानच्या आग्नेय प्रांत कहरामनमारास येथे होते. हा भूकंप इतका जोरदार होता की, काही लोक घराबाहेरही पडू शकले नाही. कैरोपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. 

Web Title: Turkey Earthquake: Massive Earthquake Moves Turkey 5 Meters Off Syria; Fear of changing the direction of rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.