टर्की : 200 जणांचा बळी घेत टर्कीमधलं लष्करी बंड शमलं

By admin | Published: July 16, 2016 06:30 AM2016-07-16T06:30:50+5:302016-07-16T18:23:32+5:30

टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे

Turkey: The execution of the Turkish military with the killing of 200 people shamla | टर्की : 200 जणांचा बळी घेत टर्कीमधलं लष्करी बंड शमलं

टर्की : 200 जणांचा बळी घेत टर्कीमधलं लष्करी बंड शमलं

Next

ऑनलाइन लोकमत
अंकारा, दि. १६ -  तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हे बंड अखेर शमलं असून 5 जनरल्स व 27 कर्नल्स यांच्यासह लष्करामधल्या तब्बल 2000 बंडखोरांना अटक करण्यात आली आहे. 1960 पासून लष्करातील अधिकाऱ्यांनी केलेला हा बंडाचा पाचवा प्रयत्न होता. मात्र, हे बंड पूर्णपणे मोडीत काढण्यात आलं असून जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या हातीच सत्तेची सूत्रं असल्याची ग्वाही सरकारनं दिलं आहे.

तुर्कस्तान येथील विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच लष्कराच्या या उठावामुले देशभरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्कराच्या बंडखोर गटाने उठाव करत सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा केला आहे, मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालटाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. हेलिकॉप्टरमधून झालेल्या हल्ल्यात व सरकारशी बांधील सैन्याने केलेल्या विरोधात एकंदर 200 जण ठार झाले आहेत. इस्तंबुल व राजधानी अंकारा शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या फुटीर गटाने काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांस बंदी बनवले आहे. राष्ट्राध्यक्ष तय्यीप अर्दोजेन यांनी परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणास असल्याचे सांगताना, टर्कीमध्ये लष्कराच्या हातात कधीही सत्ता जाणार नाही आणि लोकशाही मार्गाने आलेले सरकारच सत्तेत राहील याची ग्वाही दिली.

लोकांनी रस्त्यावर उतरून अर्दोजेन यांच्या सरकारला पाठिंबा दर्शवला

लष्करातील एका गटाने शुक्रवारी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला, बंडखोरांनी हेलिकॉप्टरमधून केलेल्या हल्ल्यात १७ पोलिसांसह काही निरपराध नागरिकही मारले गेले असून, एकूण मृतांचा आकडा 200 झाला असून तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बंडखोर सैनिकांनी तुर्कस्तानच्या संसदेवरही बॉम्बहल्ला केला आहे, मात्र पोलिसांनी व इनामदार लष्करी गटांनी प्राणपणाने लढा देत हा हल्ला परतवून लावला आहे. सरकारच्या आदेशानुसार लष्कराने देशव्यापी प्रतिशोध मोहीम हाती घेतली असून तब्बल 1,563 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे दहशतवाद्यांशी लष्कर लडा देते त्याप्रमाणेच लष्करातल्या फुटीरांविरोधात कारवाई करण्यात येईल असे सरकारने जाहीर केले आहे.

बंडखोरांना लष्कराने नामोहरम केल्यानंतर लोकांनी असा आनंद व्यक्त केला

दरम्यान,  लोकशाहीला नुकसान पोहोचणाऱ्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत,  देशातील सध्या स्थिती नियंत्रणात आहे. लष्कराची ही चाल यशस्वी होणार नाही, देशातील सत्तापालट करण्याचा प्रयत्न करणा-यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असे पंतप्रधान येल्डरिन यानी म्हटले आहे. तर राष्ट्रपती इर्दोगन यांनी देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टर्कीमधल्या सगळ्या राजकीय पक्षांनी विद्यमान सरकारच्या मागे ठामपणे उभे रहावे असे आवाहन केले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या तय्यीप अर्दोजेन यांचेच सरकार सत्तास्थानी रहायला हवे अशी भूमिका ओबामा यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी अंकारामधील भारतीय नागरिकांना तेथील परिस्थिती शांत होईपर्यंत नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन केले आहे.  भारतीय नागरिकासांठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून तो  +905303142203 असा आहे. तर इस्तांबुल मधील नागरिकासाठी  +905305671095 हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. 

Web Title: Turkey: The execution of the Turkish military with the killing of 200 people shamla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.