India-Turkey: भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:31 AM2022-06-02T03:31:20+5:302022-06-02T03:48:40+5:30

Turkey Rejects India Wheat Consignment : तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

Turkey rejects india's wheat consignment says this reason | India-Turkey: भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर

India-Turkey: भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर

Next

स्वतःला पाकिस्तानचा आयर्न ब्रदर म्हणवून घेणारा तुर्कस्तान (Turkey) सध्या अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहे. यामुळे भारताने त्याला मदत म्हणून गव्हाची खेप पाठवली होती. मात्र त्याने ती स्वीकारण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, असे करण्यामागचे कारण सांगताना तुर्कस्तान सरकारने, असा काही युक्तिवाद केला आहे, की ज्यावर सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

भारताने पाठवलेल्या गव्हात सापडला रुबेला व्हायरस - 
यासंदर्भात बोलताना तुर्की सरकारच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे, "भारताने पाठवलेल्या गव्हात रुबेला व्हायरस आढळून आला आहे. यामुळे त्यांनी पाठवलेली 56 हजार 877 मेट्रिक टन गव्हाची खेप नाकारण्यात आली आहे." तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल.

तुर्कीच्या विनंतीवरून पाठवण्यात आला होता 56 हजार मेट्रिक टन गहू-
जगभरातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने, भारतातही गहू आणि तांदळाच्या किमती वाढायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, मित्र देशांना त्यांची गरज आणि परस्पर संबंध लक्षात घेत गव्हाची विक्री केली जात आहे.

तुर्कस्तान आणि भारताचे संबंध चांगले नाहीत. पण त्यांनी गहू पाठवण्याची विनंती केल्यानंतर, भारत सरकारच्या सूचनेनुसार तेथे गहू पाठविण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या प्रेमात बुडालेल्या तुर्कस्तानने भारताची ही मदत नाकारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर, जवळपास 12 देशांनी भारताकडे मदत मागितली आहे.

Web Title: Turkey rejects india's wheat consignment says this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.