भारतीय सैन्याने तुर्कस्तानच्या जनतेची जिंकली मनं! म्हणाले, 'धन्यवाद भारत'...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 02:43 PM2023-02-12T14:43:13+5:302023-02-12T14:43:33+5:30
६ फेब्रुवारी दिवसी तुर्कस्तान सिरीयामध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपामध्ये आतापर्यंत २८ हजार जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, अनेक देशांतून मदत पाठवली जात आहे.
६ फेब्रुवारी दिवसी तुर्कस्तान सिरीयामध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपामध्ये आतापर्यंत २८ हजार जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला, अनेक देशांतून मदत पाठवली जात आहे. भारताने तुर्कस्तानच्या मदतीसाठी तुकड्या पाठवल्या आहेत. भारतीय सेनाने भूकंपात जखमी झालेल्या रुग्णांसाठी ६ तासात एक रुग्णालयात उबा केले असून या रुग्णालयाचा अनेकांना फायदा होत आहे. हे रुग्णालय २४ तास सेवा देत आहे. शून्यापेक्षा कमी तापमान असूनही बचावकर्ते तुर्कस्तानमध्ये ढिगाऱ्याखाली वाचलेल्यांचा शोध घेत आहेत.
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन दोस्त'चा एक भाग म्हणून उभारण्यात आलेल्या फील्ड हॉस्पिटलने काम सुरू केले आहे. तुर्कीच्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी फील्ड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन कक्ष आहेत. हे रुग्णालय हते प्रांतात आहे. ६० पॅरा फील्ड हॉस्पिटल हे भारतीय लष्कराच्या पॅरा-ब्रिगेडचा एक भाग आहे, शाळेच्या इमारतीत आपले हॉस्पिटल उभारले आहे.
Video - निरागस डोळे अन् गोबरे गाल; भूकंपाच्या 128 तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर
वैद्यकीय मदत देण्यासाठी ९६ भारतीय लष्कराच्या जवानांची टीम हॅते इस्केंडरोन येथे तैनात करण्यात आली आहे. "सुमारे ८०० लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांना आवश्यक तेवढा वेळ द्यायला आम्ही तयार आहे, असं ६० पॅरा फील्ड हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल यदुवीर सिंग म्हणाले. १० मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. लष्कराच्या या प्रयत्नाचे अनेकांनी कौतुक केले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने भारताचे आभार मानले. पीडिता म्हणाली, “तुम्ही इथे आलात याचा आम्हाला आनंद आहे.
तुर्कस्तान-सीरियात सोमवारी आलेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने भीषण विध्वंस घडवून आणला आहे. भूकंपामुळे सीरियामध्ये ३,५७४ आणि तुर्कीमध्ये २४,६७१ लोकांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या २८,१९१ झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सात शहरांमध्ये सार्वजनिक रुग्णालयांसह सुमारे ६,००० इमारती कोसळल्याचं सरकारने म्हटलं आहे. पहाटे लोक झोपेत असताना हा भूकंप आला. या विनाशकारी भूकंपामुळे हजारो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि लाखो लोक बाधित झाले.