बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:04 AM2024-10-10T11:04:38+5:302024-10-10T11:09:24+5:30

इल्सेहिन पेहलिवान असं पायलटचं नाव आहे. तुर्की एअरलाइन्सने सांगितलं की, हे पायलट २००७ पासून त्यांच्या एअरलाइन्समध्ये काम करत होते.

turkish airlines pilot died during flight prompts emergency landing in new york | बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

अमेरिकेतील सिएटल येथून तुर्कीची राजधानी इस्तंबूलला जाणाऱ्या विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. पायलटचा उड्डाणादरम्यान मृत्यू झाला. पायलटचा मृत्यू झाला तेव्हा विमान ३४००० फूट उंचीवर होतं. तुर्की एअरलाइन्सच्या या पायलटच्या मृत्यूनंतर विमानाचं न्यूयॉर्कमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ही घटना घडली झाला तेव्हा पायलटला प्राथमिक उपचार देण्यात आले, पण त्याचाही काहीही फायदा झाला नाही. यानंतर, फ्लाइट 8JK, Airbus A350-900 च्या पायलटने सकाळी सहाच्या सुमारास विमान लँड केलं. 

इल्सेहिन पेहलिवान असं पायलटचं नाव आहे. तुर्की एअरलाइन्सने सांगितलं की, हे पायलट २००७ पासून त्यांच्या एअरलाइन्समध्ये काम करत होते आणि मार्चमध्ये त्यांचं शेवटचं रेग्युलर हेल्थ चेकअप करण्यात आलं होतं, परंतु त्यावेळी कोणतीही आरोग्य समस्या आढळली नाही ज्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

विमान कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, आपल्या पायलटच्या निधनाने दुःख झालं आहे. विमान कंपनीने शोक व्यक्त केला आहे. यासोबतच प्रवाशांची जेएफकेहून इस्तंबूलला नेण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असल्याचंही सांगितलं. 
 

Web Title: turkish airlines pilot died during flight prompts emergency landing in new york

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान