जेव्हा पोलिसांना फोन करून बिझनेसमन म्हणाला - माझे स्पर्म चोरी झाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 11:25 AM2022-01-17T11:25:37+5:302022-01-17T11:26:21+5:30
ही डील झाली होत तुर्की राहणाऱ्या एका महिलेत आणि एका बिझनेसमनमध्ये. या डीलनुसार सेवाताप सेनसारी नावाची महिला आणि या बिझनेसमनने एका मुलाला जन्म देतील आणि नंतर लग्न करतील.
तुर्कीमध्ये (Turkey) एका बिझनेसमनने आरोप केला आहे की, त्याचे स्पर्म चोरी (Sperm has been stolen) झाले आहेत. हा आरोप त्याने तेव्हा लावला जेव्हा एक महिला त्याच्या विरोधात कोर्टात गेली आणि म्हणली की, त्यांना जुळी मुलं आहेत. मुळात हे प्रकरण सुरू झालं एका अजब डीलमुळे. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, ही डील झाली होत तुर्की राहणाऱ्या एका महिलेत आणि एका बिझनेसमनमध्ये.
या डीलनुसार सेवाताप सेनसारी नावाची महिला आणि या बिझनेसमनने एका मुलाला जन्म देतील आणि नंतर लग्न करतील. २००० साली ४५ वर्षीय सेनसारी घटस्फोटीत बिझनेसमन HST सोबत प्रेम झालं आणि ते लवकरच रिलेशनशिपमध्ये आले. HST ला बिझनेस पुढे नेण्यासाठी मुलगा नव्हता आणि त्यामुळे त्याला एक मुलगा हवा होता. मग ते दोघे यासाठी ठरवलं की त्याला एक मुलगा होईल या गॅरंटीसाठी विट्रो फर्टिलायझेशन करायला हवं.
HST ने आश्वासन दिलं होतं की मुलगा जन्माला आल्यावर तो तिच्यासोबत लग्न करेल. तो मुलाला त्याचं नावे देणार आणि दोघांनाही आर्थिक रूपानेही समर्थन देईल. मग २०१५ मध्ये सेनसारी मुलाला जन्म देण्याची प्रोसेस सुरू करण्यासाठी HST चे स्पर्म साइप्रसला घेऊन गेली. कारण तुर्कीतील चिकित्सा प्रणाली अविवाहित जोडप्यांना विट्रो फर्टिलायजेशनची सेवा देत नाही.
यासाठी दोन मेल भ्रूणांची निवड करण्यात आली आणि सेनसारीच्या गर्भात प्रत्यारोपित करण्यात आले. ९ महिन्यानंतर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. यानंतर जेव्हा सेनसारीने ६१ वर्षीय HST ला डीलनुसार गोष्टी करायला सांगितल्या तेव्हा त्याने नकार दिला. इतकंच नाही तर त्याने आई आणि मुलांसोबत गैरव्यवहारही केला.
महिला याप्रकरणी कोर्टात पोहोचली आणि HST कडून २० लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून मागणी केली. महिला कोर्टात म्हणाली की, 'HST १७ वर्षापर्यंत मला मारहाण करत राहिला आणि मी कधी काही बोलली नाही. पण आता मुलांच्या जन्मानंतर असं काही व्हावं अशी माझी इच्छा नाही'.
HST ने कोर्टासमोर आपले डीएनए सॅम्पल देण्यास नकार दिला आणि फॅमिली कोर्टाला सांगितलं की, त्याचे स्पर्म चोरीला गेले होते आणि पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान तुर्कीच्या एका कोर्टाने निर्णय दिला की, जर सेनसारीला स्पर्म मिळाले म्हणजे याचा अर्थ ते HST ने स्वत:च्या इच्छेने तिला दिले असतील. अजूनही हे प्रकरण कोर्टात आहे आणि त्यावर सुनावणी सुरू आहे.