‘ई-मेल’ची बत्तीशी; भारतीयाने लावला होता शोध
By admin | Published: August 31, 2014 01:59 AM2014-08-31T01:59:58+5:302014-08-31T01:59:58+5:30
ई-मेल आज 32 वर्षाचा झाला. मात्र, वेगाने संदेश पोहोचविणा:या या प्रणालीचे जनक भारतीय वंशांचे व्ही.ए. शिवा अय्यादुराई हे असल्याचे फारच कमी लोकांना माहीत असेल.
Next
वॉशिंग्टन : ई-मेल आज 32 वर्षाचा झाला. मात्र, वेगाने संदेश पोहोचविणा:या या प्रणालीचे जनक भारतीय वंशांचे व्ही.ए. शिवा अय्यादुराई हे असल्याचे फारच कमी लोकांना माहीत असेल. अय्यादुराई यांनी या प्रणालीचा शोध लावला तेव्हा ते अवघ्या 14 वर्षाचे होते. 1978 मध्ये अय्यादुराई यांनी ई-मेल नावाचा कॉम्प्युटर प्रोग्राम तयार केला होता. त्यात इन बॉक्स, आऊट बॉक्स, फोल्डर्स, मेमो आणि अटॅचमेंट आदी सर्व काही होते. आज हे फिचर प्रत्येक ई-मेल प्रणालीचे अविभाज्य भाग बनलेले आहेत. अमेरिकी सरकारने 3क् ऑगस्ट 1982 रोजी अय्यादुराई यांना ईमेलचे जनक म्हणून अधिकृतरीत्या मान्यता दिली होती.
न्यू जर्सी येथील लिव्हिंगस्टोन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या अय्यादुराई यांनी न्यू जर्सीतीलच एका विद्यापीठासाठी ई-मेल सुविधा तयार करण्याचे काम सुरू केले. 1978 मध्ये त्यांनी कार्यालयांतर्गत संदेश देवाणघेवाणीची सुविधा विकसित करून तिला ई-मेल असे नाव दिले. त्यांना 1982 मध्ये या प्रणालीचे पहिले अमेरिकी कॉपीराईट मिळाले.
सॉफ्टवेअर संशोधन संरक्षित करण्याचे अन्य कोणतेही उपाय नसल्यामुळे तेव्हा कॉपीराईटलाच पेटंटचा दर्जा होता, असे हफिंगटोन पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. ई- मेलच्या शोधासाठी त्यांना 1981 मध्ये वेस्टिंगहाऊस सायन्स टॅलेन्ट सर्च अवॉर्डने गौरविण्यात आले होते. ई-मेलसाठीची अधिकृत कॉपीराईट नोटीस आता स्मीथसोनियन इन्स्टिटय़ूशन नॅशनल म्युङिायम ऑफ अमेरिकन हिस्ट्रीकडे आहे.
(वृत्तसंस्था)
4अय्यादुराई यांचा जन्म मुंबईत तामीळ कुटुंबात झाला होता. ते सात वर्षाचे असताना त्यांचे कुटुंबीय अमेरिकेला स्थलांतरित झाले होते.
4शालेय शिक्षण घेताना त्यांनी संगणक अभ्यासासाठी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या उन्हाळी वर्गाला प्रवेश घेतला होता.