30 वर्षांच्या स्त्रीबीजांपासून जुळ्या मुलांचा जन्म, आगळीवेगळी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:26 PM2022-11-28T12:26:26+5:302022-11-28T12:28:23+5:30

अमेरिकेच्या वैद्यक इतिहासातील आगळी घटना

Twins born from 30-year-old woman's sperm | 30 वर्षांच्या स्त्रीबीजांपासून जुळ्या मुलांचा जन्म, आगळीवेगळी घटना

30 वर्षांच्या स्त्रीबीजांपासून जुळ्या मुलांचा जन्म, आगळीवेगळी घटना

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये गेल्या ३० वर्षांपक्षा अधिक काळापासून फ्रीज केलेल्या स्त्रीबीजामुळे एक दांपत्य जुळ्या मुलांचे माता-पिता बनले आहेत. हे स्त्रीबीज २२ एप्रिल १९९२ रोजी उणे १२८ तापमानात द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवण्यात आले होते. सर्वात जास्त काळ फ्रीज केलेल्या स्त्रीबीजापासून अपत्यप्राप्ती होणे हा नवा विक्रम असल्याचा दावा केला जात आहे.

चार मुलांची आई असलेल्या रेचल रिझवेने जुळ्यांना जन्म दिला. रेचल तिचा पती फिलिप रिजवे याच्यासह नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटर येथे गेली होती. तिथे सर्वाधिक काळ फ्रीज करून ठेवलेल्या स्त्रीबीजापासून अपत्यप्राप्ती व्हावी अशी इच्छा असल्याचे या दांपत्याने सांगितले होते.

१५ ते २० लाख स्त्रीबीजांचे जतन
nएनईडीसीचे वैद्यकीय संचालक डॉक्टर जॉन डेव्हिड यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये १५ ते ३० लाख स्त्रीबीज फ्रीज करून ठेवण्यात 
आली आहेत. 
nअपत्यप्राप्तीसाठी लोक आयव्हीएफ तंत्राचा वापर करतात. त्यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक स्त्रीबीजे तयार होऊ शकतात. त्यातील अतिरिक्त स्त्रीबीज भविष्यात अन्य लोकांच्या उपयोगी येऊ शकतात. 
nत्यामुळे ही द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवण्यात येतात. एनडीईसीमध्ये जतन केलेल्या स्त्रीबीजांच्या मदतीने आतापर्यंत १२००० हून अधिक अपत्यांचा जन्म झाला आहे.

अनामिक दांपत्याकडून स्त्रीबीजाचे दान
तीस वर्षांहून एका दांपत्याने दान केलेले स्त्रीबीज नीट जतन करून ठेवण्यात आले होते. या दांपत्याचे नाव कधीही उघड करण्यात आले नाही. अमेरिकेत स्त्रीबीज दान करण्यासाठी फूड-ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 
स्त्रीबीजाला कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रासलेले नाही ना याची बारकाईने तपासणी करण्यात येते. खूप वर्षे जपून ठेवलेल्या स्त्रीबीजांपेक्षा कमी काळ जतन केलेल्या स्त्रीबीजांना अपत्यप्राप्तीची इच्छा असलेले दांपत्य प्राधान्य देतात. 

Web Title: Twins born from 30-year-old woman's sperm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.