Twitter: मालकासोबतच ‘भिडला’, वाद नडला, मस्क यांनी बसविले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:50 AM2022-11-16T06:50:52+5:302022-11-16T06:51:24+5:30
Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ८० तास काम करण्याची घोषणा केली. आता इलॉन मस्कने ट्विटरवरूनच एरिक फ्रॉनहोफर या इंजिनिअरला नोकरीवरून काढून टाकल्याची घोषणा केली आहे.
इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ८० तास काम करण्याची घोषणा केली. आता इलॉन मस्कने ट्विटरवरूनच एरिक फ्रॉनहोफर या इंजिनिअरला नोकरीवरून काढून टाकल्याची घोषणा केली आहे. दोघांमधील वादाची सुरुवात झाली १३ नोव्हेंबर रोजी. अनेक देशांमध्ये ट्विटर सुपर स्लो काम करत असल्याबद्दल मी माफी मागतो, असे ट्वीट मस्क यांनी केले हाेते. त्यावर एरिकने रिप्लाय दिला आणि मी सहा वर्षांपासून ट्विटर अँड्रॉइडसाठी काम करतोय... हे चुकीचे आहे... असे म्हटले. त्यावर मस्कने, हे सुधारण्यासाठी तू काय केलेस? अशी विचारणा केली. त्यानंतर एका नेटकऱ्याने मस्कला टॅग करून ‘अशा प्रकारची वृत्ती’ असलेली व्यक्ती तुझ्या टीममध्ये हवी आहे का? अशी विचारणा केली. त्यावर, त्याची हकालपट्टी झाली आहे, असे ट्वीट मस्कने केले. सार्वजनिक मंचावर आपल्या बॉससोबत असे वर्तन अव्यावसायिक आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तर, मस्क यांना स्वतःची चूक दाखवलेले आवडत नाही, असे म्हणणारेही अनेक जण आहेत.