Twitter New CEO : कुत्रा बनला Twitter चा CEO; Elon Musk यांची मोठी घोषणा, म्हणाले- 'हा इतरांपेक्षा चांगला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:42 PM2023-02-15T15:42:16+5:302023-02-15T15:44:41+5:30

Twitter New CEO : इलॉन मस्क यांनी आपल्या पाळी कुत्र्याला ट्विटरचा नवीन CEO बनवले आहे.

Twitter New CEO : Dog Becomes CEO of Twitter; Elon Musk's big announcement, said- 'she is better than others...' | Twitter New CEO : कुत्रा बनला Twitter चा CEO; Elon Musk यांची मोठी घोषणा, म्हणाले- 'हा इतरांपेक्षा चांगला...'

Twitter New CEO : कुत्रा बनला Twitter चा CEO; Elon Musk यांची मोठी घोषणा, म्हणाले- 'हा इतरांपेक्षा चांगला...'

googlenewsNext


Twitter New CEO : प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये एक CEO असतो, ज्याच्यावर कंपनीची जबाबदारी असते. तो आपल्या बुद्धीकौशल्याने कंपनीच्या वाढीसाठी काम करत असतो. पण, तुम्ही एखादा प्राणी कंपनीचा सीईओ झाल्याचे ऐकले आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांचा पाळी कुत्रा फ्लोकीला ट्विटरचा (Twitter) सीईओ बनवले आहे. 

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेण्यापूर्वी पराग अग्रवाल (Parag Agarwal) ट्विटरचे सीईओ होते, मात्र मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर त्यांनी पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पराग अग्रवाल यांना हटवल्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी स्विकारली. पण, काही दिवसानंतर त्यांनी नवीन सीईओच्या शोधात असल्याचे सांगितले. आता अखेर त्यांना नवीन सीईओ मिळाला आहे.

फ्लोकी बनला ट्विटरचा नवीन सीईओ 
इलॉन मस्क यांना वाटते की, त्यांचा कुत्रा फ्लोकी इतर सीईओंपेक्षा खूपच चांगला आहे. इथे त्यांचा संदर्भ थेट पराग अग्रवाल यांच्याकडे आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले होते. केवळ अग्रवालच नाही तर मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढले. आता मस्क यांनी त्यांचा पाळीव कुत्रा फ्लोकी याला ट्विटरच्या सीईओच्या खुर्चीवर बसवले आहे.

इलॉन मस्क यांनी सीईओच्या खुर्चीवर बसलेला त्यांचा कुत्रा फ्लोकीचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये फ्लोकी ब्रँडेड ब्लॅक टी-शर्ट घातलेला दिसत आहे, ज्यावर सीईओ लिहिले आहे. फोटोत फ्लोकीसमोर टेबलावर काही कागदपत्रे दिसत आहेत, ज्यात फ्लोकीच्या पंजाचे ठसे आणि Twitter लोगो देखील आहे. फ्लोकीच्या समोर एक छोटा लॅपटॉप देखील आहे, ज्यामध्ये ट्विटरचा लोगो बनवला आहे. 
 

Web Title: Twitter New CEO : Dog Becomes CEO of Twitter; Elon Musk's big announcement, said- 'she is better than others...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.