टि्वटरनं इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख अकाउंट केली बंद
By admin | Published: February 6, 2016 02:16 PM2016-02-06T14:16:00+5:302016-02-06T14:16:00+5:30
टि्वटरने गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित सव्वा लाख अकाउंट बंद केली आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ६ - टि्वटरने गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित सव्वा लाख अकाउंट बंद केली आहेत. ज्यावेळी अन्य युजर तक्रार करतात त्याचवेळी अकाउंट बंद करण्यात येतात असं टि्वटरनं म्हटलंय. तक्रारींची दखल घेणा-या अधिका-यांची संख्या वाढवण्यात आल्याचं आणि प्रतिसाद खूपच त्वरेने देत असल्याचं सांगितलं.
दहशतवादाचा वाढता धोका आणि त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा प्रसार रोखण्यासाठी फेसबुकसह अनेक कंपन्यांनी वादग्रस्त पोस्टना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थात, अशा प्रकारच्या बंदीची मागणी जगभरातल्या देशांकडून राजकीय कारणास्तव करण्यात येईल अशी काळजीही सोशल मीडिया कंपन्यांना वाटत आहे. तसेच, या कंपन्या विविध देशांमधल्या सरकारच्या हातचं बाहुलं बनतात की काय अशी भीतीही त्यांना सतावत आहे.
इस्लामिक स्टेटला आळा घालण्यासाठी टि्वटर पुरेसे उपाय योजत नसल्याची जोरदार टीका झाल्यानंतर टि्वटरने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.
इराक व सीरियामध्ये बस्तान बसवलेल्या इस्लामिक स्टेटने टि्वटर तसेच अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सचा दहशतवाद्यांच्या भरतीसाठी प्रचंड वापर केल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे.