अल-कायदाला मदत करणाऱ्या दोघांना अटक
By admin | Published: November 8, 2015 02:07 AM2015-11-08T02:07:48+5:302015-11-08T02:07:48+5:30
अल-कायदाचा मारला गेलेला अतिरेकी नेता अल-अवलाकी याला जिहादसाठी वित्तीय साहाय्य करणाऱ्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे
वॉशिंग्टन : अल-कायदाचा मारला गेलेला अतिरेकी नेता अल-अवलाकी याला जिहादसाठी वित्तीय साहाय्य करणाऱ्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या चार जणांत दोन भारतीय असून, त्यापैकी एकावर दहशतवादाशी निगडित आरोप ठेवण्यात आले आहेत. उर्वरित दोघे संयुक्त अरब अमिरातीचे नागरिक आहेत.
या सर्वांवर येथील एका न्यायालयात आरोप ठेवण्यात आले आहेत. याह्या फारुख मोहंमद (३७), त्याचा भाऊ इब्राहीम जुबेर मोहंमद (३६) अशी दोन भारतीयांची नावे आहेत. आसिफ अहमद सलीम (३५), त्याचा भाऊ सुलतान सम सलीम (४०) हे अन्य दोघे आहेत. फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशनने गुरुवारी इब्राहीमला टेक्सासमध्ये अटक केली होती. तो टेक्सासमध्येच राहत होता. इब्राहीमचा भाऊ याह्या संयुक्त अरब अमिरातीत राहतो. (वृत्तसंस्था)