दोन आॅस्ट्रेलियन मंत्र्यांचे राजीनामे
By admin | Published: December 30, 2015 02:36 AM2015-12-30T02:36:48+5:302015-12-30T02:36:48+5:30
आॅस्ट्रेलियाच्या दोन मंत्र्यांना कथित स्कँ डलवरून सोमवारी राजीनामे द्यावे लागले. हाँगकाँगच्या बारमध्ये गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मूलभूत सोयी व विभागीय विकासमंत्री जॅमी ब्रिक्स
सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या दोन मंत्र्यांना कथित स्कँ डलवरून सोमवारी राजीनामे द्यावे लागले. हाँगकाँगच्या बारमध्ये गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मूलभूत सोयी व विभागीय विकासमंत्री जॅमी ब्रिक्स यांनी पद सोडले, तर एका राजकीय व्यक्तीची डायरी बेकायदा हस्तगत केल्यावरून विशेष राज्यमंत्री माल ब्राव्ह यांंनी राजीनामा दिला.
बीबीसीच्या वृत्तानुसार एकाचवेळी दोन महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांची पीछेहाट मानली जात आहे. जॅमी ब्रिक्स म्हणाले की, नोव्हेंबरात हाँगकाँग दौऱ्यावर असताना आपल्या काही सहकाऱ्यांसह रात्री जेवणानंतर आपण एका बारमध्ये गेलो; पण तिथे काही वावगे घडले नाही. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये एक महिला अधिकारी होती व तिने नंतर मंत्र्यांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती.
माल ब्रॉह यांनी माजी सभापती पीटर स्लीपर यांची डायरी हस्तगत केली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. स्लीपर यांच्यावर त्यांच्या महिला सहकाऱ्याचा शारीरिक छळ केल्याचा आरोप होता; पण ते त्यातून मुक्त झाले आहेत.
माल ब्रॉव्ह यांनी त्या काळात स्लीपर यांची डायरी पळवली असा आरोप आहे. आपण काही चुकीचे केलेले नाही असे ब्रॉव्ह यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)