शांतता फेरीत दोन बॉम्बस्फोट, ८६ ठार
By admin | Published: October 11, 2015 05:16 AM2015-10-11T05:16:22+5:302015-10-11T05:16:22+5:30
शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यास २४ तास उलटण्याच्या आत तुर्कस्तानच्या राजधानीत शांतता फेरीत शनिवारी घडविण्यात आलेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये शांततेचे ८६ समर्थक
अंकारा : शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यास २४ तास उलटण्याच्या आत तुर्कस्तानच्या राजधानीत शांतता फेरीत शनिवारी घडविण्यात आलेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये शांततेचे ८६ समर्थक ठार, तर १८६ लोक जखमी झाले. डाव्या व कुर्दिश समर्थक विरोधी गटाने या फेरीचे आयोजन केले होते. राजधानी अंकाराच्या मुख्य रेल्वेस्थानकाजवळ हल्ला झाला. शहराच्या इतिहासातील सर्वात घातक अशा या हल्ल्याने एक नोव्हेंबरलाच्या निवडणुकीपूर्वी देशातील तणाव वाढला आहे.
निषेध : या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तईफ इरडोगान म्हणाले.
निर्भत्सना : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलोंद यांनी हल्ल्याची निर्भत्सना केली.
हात कुणाचा : हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे
एकजूट
हल्ल्यानंतर तुर्कीत अस्थिरता निर्माण होण्याची चिंता असून, युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरणप्रमुख फेड्रिका मोघेरिनी यांनी तुर्कीच्या नागरिकांना दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले.
स्फोटांनंतर जिकडे तिकडे निदर्शकांचे मृतदेह दिसत होते. काही क्षणापूर्वी त्यांच्या हाती शांततेचा आवाज बुलंद करणारे बॅनर्स दिमाखात फडकत होते. स्फोटानंतर तेच बॅनर्स त्यांच्या निष्प्राण देहांजवळ निपचित पडले होते.