उत्तराखंडमध्ये चीनचे दोन हेलिकॉप्टर घुसले
By admin | Published: July 16, 2014 02:15 AM2014-07-16T02:15:50+5:302014-07-16T02:15:50+5:30
चीनचे दोन हेलिकॉप्टर ३० एप्रिल आणि १३ जूनला उत्तराखंडच्या हद्दीत आले होते, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.
नवी दिल्ली : चीनचे दोन हेलिकॉप्टर ३० एप्रिल आणि १३ जूनला उत्तराखंडच्या हद्दीत आले होते, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.
वास्तविक नियंत्रण रेषेच्या उल्लंघनाच्या दोन्ही घटनांबाबत अनुक्रमे ५ मे आणि २३ जून २०१४ ला ध्वज बैठकीत भारताने चीनकडे विरोध प्रकट केला होता. भारत आणि चीनचा वास्तविक नियंत्रण रेषेबद्दल वेगवेगळा दृष्टिकोन असल्याने सीमोल्लंघन होत असते, असेही ते म्हणाले.
मोतीलाल व्होरा यांच्या प्रश्नाला लिखित उत्तरात ते म्हणाले, उल्लंघनाच्या या घटनांचे मुद्दे ध्वज बैठका, सीमा कर्मचाऱ्यांच्या बैठका आणि भारत-चीन सीमा मुद्यांवर विचारविनियम तसेच समन्वयाकरिता स्थापित प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित केले जातात. (वृत्तसंस्था)