Coronavirus: दोन सामान्य औषधी कोरोनावर अधिक प्रभावी; संशोधकांचा दिलासादायक रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 05:34 AM2021-12-11T05:34:09+5:302021-12-11T05:34:39+5:30
फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांचा निष्कर्ष, हे संयुग सार्स-सीओव्ही-२ या विषाणूचा प्रसार रोखते. फ्लोरिडा विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर डेव्हीड ए. ऑस्ट्रोव्ह यांनी सांगितले
वॉशिंग्टन : कोविड-१९ होण्यास कारणीभूत असलेल्या सार्स-कोव्ह-२ या विषाणूंची प्रतिकृती रोखण्यास दोन अत्यंत साधारण औषधी गुणकारी आहेत, असा दावा एका नवीन अध्ययनात करण्यात आला आहे.
फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, या औषधीच्या संयोगात डायफेन हैड्रामाईचा समावेश आहे. माकडांच्या पेशी आणि मानवी फुफ्फसाच्या पेशीवरील चाचणीत असे आढळले की, उपरोक्त औषधाला गाय किंवा मानवी दुधात आढळणाऱ्या ‘लॅक्टोफेरीन’सोबत मिसळल्यास, हे संयुग सार्स-सीओव्ही-२ या विषाणूचा प्रसार रोखते. फ्लोरिडा विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर डेव्हीड ए. ऑस्ट्रोव्ह यांनी सांगितले की, कोविड-१९ कारक विषाणूवर काही औषधी प्रभावी का आहेत? हे कळले. नंतर आम्हाला एक विषाणूविरोधी संयुग आढळले.