पॅरिसमधील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आयसिसनं स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 07:01 AM2018-05-13T07:01:37+5:302018-05-13T07:19:49+5:30

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

Two die in Paris knife attack; Isisen accepted responsibility | पॅरिसमधील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आयसिसनं स्वीकारली जबाबदारी

पॅरिसमधील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आयसिसनं स्वीकारली जबाबदारी

Next

पॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईत अज्ञात हल्लेखोर ठार झाला असून या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली आहे. 

शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या मध्यवर्ती भागात एका अज्ञात व्यक्तीनं आसपास असलेल्या लोकांवर चाकूहल्ला सुरु केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. चौघा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चाकूनं वार करण्याआधी 'अल्लाहू अकबर' असं ओरडत होता. या माहितीच्या आधारे आता या प्रकरणाचा दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीनं तपास करण्यात येत आहे. 





चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठार केल्याची माहिती गृहमंत्री गेरार्ड कोलॉम्ब यांनी दिली. कोलॉम्ब यांनी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं आहे. मात्र अद्याप हल्लेखोराची ओळख पटू शकलेली नाही. फ्रान्समध्ये 2015 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. सेंट डेनिसमध्ये भागात झालेल्या हल्ल्यात 129 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर 2016 मध्ये फ्रेंच नॅशनल डेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्ये ट्रक घुसवण्यात आल्यानं 84 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात 50 हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 230 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Two die in Paris knife attack; Isisen accepted responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.