सदोष होव्हरबोर्डमुळे दोन मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2017 01:57 AM2017-05-03T01:57:03+5:302017-05-03T01:57:14+5:30
होव्हरबोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन मुली जळून मृत पावल्याचा निष्कर्षाप्रत फेडरल सुरक्षा नियामक
Next
ऑनलाइन लोकमत
पेनसिल्वेनिया, दि. 3 - होव्हरबोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत दोन मुली जळून मृत पावल्याचा निष्कर्षाप्रत फेडरल सुरक्षा नियामक आले आहेत. हॅरिसबर्ग येथे १0 मार्चला ही दुर्घटना होऊन १0 व ३ वर्षे वयाच्या दोन मुली ठार झाल्या होत्या. लेझ बोर्ड यंत्रणेमध्ये हा दोष असल्याचे अमेरिकेच्या कन्ज्युमर प्रॉडक्ट सेफ्टी कमिशनने भारतीय वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जाहीर केले.