जर्मनीत दोन रेल्वेंची टक्कर; नऊ ठार
By Admin | Published: February 10, 2016 02:13 AM2016-02-10T02:13:38+5:302016-02-10T02:13:38+5:30
दोन प्रवासी रेल्वेंची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत ९ जण ठार, तर अन्य १५० जण जखमी झाले. दक्षिण जर्मनीतील दुर्गम भागात सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बर्लिन : दोन प्रवासी रेल्वेंची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत ९ जण ठार, तर अन्य १५० जण जखमी झाले. दक्षिण जर्मनीतील दुर्गम भागात सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागातील ही आजवरची सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. बॅव्हरियाधील बद एबलिंगनजीकच्या एकेरी रेल्वेमार्गावर घडलेल्या दुर्घटनेमुळे डबे रुळावरून घसरत एकमेकांवर चढले. चेंदामेंदा झालेले डबे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नदीपार करून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. जखमींपैकी ५० जणांंना गंभीर दुखापत झाली आहे. डब्यांतून जखमींना बाहेर काढण्याचे काम दुपारपर्यंत चालू होते.