दोन सौदी महिलांची न्यायालयात सुनावणी

By admin | Published: December 26, 2014 11:54 PM2014-12-26T23:54:42+5:302014-12-26T23:54:42+5:30

सौदी अरेबियात वाहन चालवताना पकडलेल्या दोन महिला चालकांना दहशतवादी न्यायालयात सुनावणीसाठी हजर व्हावे लागले.

Two Saudi women hear in court | दोन सौदी महिलांची न्यायालयात सुनावणी

दोन सौदी महिलांची न्यायालयात सुनावणी

Next

रियाध : सौदी अरेबियात वाहन चालवताना पकडलेल्या दोन महिला चालकांना दहशतवादी न्यायालयात सुनावणीसाठी हजर व्हावे लागले. अल अहसा या पूर्वेकडील प्रांतात ही घटना घडली आहे; पण कार्यकर्त्यांनी आपले नाव सांगितले नाही.
सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्यास बंदी आहे. लौजेन हॅथलूल या महिलेला वाहन चालविण्याच्या आरोपाखाली १ डिसेंबर रोजी अटक झाली. अरब अमिरातीत सौदी महिला पत्रकार मयासा अलमौदी या लौजेनला मदत करण्यासाठी आल्या असता त्यांनाही अटक करण्यात आली.
या दोघींवर काय आरोप ठेवण्यात आले आहेत हे स्पष्ट झालेले नाही; पण या महिलांच्या सामाजिक कार्यावर अधिक लक्ष दिले जाईल, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. लौजेन यांना टिष्ट्वटरवर २ लाख २८ हजार समर्थक आहेत.
अलमौदीचे १ लाख ३१ हजार समर्थक असून, यू ट्यूबवर अलमौदीने वाहन चालविण्यावरील बंदीवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Two Saudi women hear in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.