CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 09:45 PM2020-05-01T21:45:16+5:302020-05-01T22:03:53+5:30
येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत.
लंडन: कधी काळी जगाच्या बऱ्याच मोठ्या भू-भागावर राज्य करणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांनी आता कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत. एका सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे.
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, एक सर्वेक्षणात, लॉकडाउन हटवल्यानंतरही आपण गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, असे इंग्लंडमधील दोन तृतियांश लोकंनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर येथील नागरिकांनी खेळाच्या आयोजनाकडे आणि संगीत कार्यक्रमांकडेही पाठ फिरवली आहे. हे सर्व कोरोनाच्या दहशतीमुळेच घडले आहे.
CoronaVirus News : आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी
दोन तृतियांश लोकांचा घरातून बाहेर पडण्यास नकार -
एका सर्वेक्षणानुसार, येथील जनतेला सरकारने घरातून बाहेर न पडण्याचे जे आवाहन केले होते. त्याचा मोठा परिणाम झाला आहे. येथील सहा पैकी केवळ एकाच व्यक्तीने, म्हटले आहे, की लॉकडाउन उठवल्यास आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकतो. मात्र इतर सर्वांनी आपण घरातच राहणार, असे म्हटले आहे.
हे सर्वेक्षण आयपीएसओएस मूरीजने केले आहे. रिसर्चमध्ये म्हणण्यात आले आहे, की कोरोनापूर्वी येथील लोक जसे गर्दीच्या ठिकाणी, पब्लिक ट्रांसपोर्ट, बार आणि रेस्टॉरंटमध्ये जात होते, तसे आता जाणार नाहीत, असे या सर्वेक्षणात दोन तृतियांश लोकांनी म्हटले आहे.
रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग
मुलांना शाळेत पाठवण्यावर वेगवेगळे मत -
येथील 48 टक्के लोकांचे म्हणणे आहे, की मुलांना शाळेत पाठवताना आम्हाला चिंता वाटेल. तर 41 टक्के लोक म्हणत आहे, की यासाठी आम्ही कंफर्टेबल आहोत. तर, तरुणांमध्ये लॉकडाउन उठवण्यासंदर्भात उत्सुकता आहे. सर्वाधिक तरुणांनी, लॉकडाउन उठल्यानंतर आपण बार, रेस्टॉरंट आणि गर्दीच्या ठिकाणी जाणार असल्याचे म्हटले आहे.
CoronaVirus News: कोरोनाचा सामना करण्यासाठी जगाने 'या' देशाचे मॉडेल वापरावे - UN