दोन विजेत्यांना ६४ अब्ज रु.चा जॅकपॉट

By admin | Published: January 11, 2016 02:48 AM2016-01-11T02:48:05+5:302016-01-11T02:48:05+5:30

इंग्लंडमध्ये लॉटरी ड्रॉचा नवीन विक्रम झाला. शनिवारी अशाच एका लॉटरी ड्रॉमध्ये दोन विजेत्यांच्या नावाने ६६ दशलक्ष पाऊंडचे (जवळपास ६४ अब्ज रुपये) ड्रॉ काढण्यात आले.

The two winners have a jackpot of Rs 64 billion | दोन विजेत्यांना ६४ अब्ज रु.चा जॅकपॉट

दोन विजेत्यांना ६४ अब्ज रु.चा जॅकपॉट

Next

लंडन : इंग्लंडमध्ये लॉटरी ड्रॉचा नवीन विक्रम झाला. शनिवारी अशाच एका लॉटरी ड्रॉमध्ये दोन विजेत्यांच्या नावाने ६६ दशलक्ष पाऊंडचे (जवळपास ६४ अब्ज रुपये) ड्रॉ काढण्यात आले.
ब्रिटनमधील ‘द इंडिपेंडेंट’ या वृत्तपत्राने कॅमलॉटचा हवाला देऊन म्हटले आहे की, ड्रॉचे विजेते क्रमांक ५८, ४७, २७, ४६, ५२, २६ होते, तर बोनस क्रमांक ४८ होता. दोन्ही भाग्यवान विजेते आता परस्परात ३३-३३ दशलक्ष डॉलर (जवळपास ३२-३२ अब्ज रुपये) पुरस्काराची रक्कम वाटून घेतील. ब्रिटनच्या लॉटरी इतिहासात हे दोघेही सर्वात मोठे विजेते म्हणून उदयास आले आहेत.
नवीन नियमांतहत शनिवारी सायंकाळी या विजेत्यांची घोषणा करण्यात आली; परंतु जाहीर करण्यात आलेले विजेते क्रमांक कोणत्या एका तिकिटावर आढळून आले नाहीत, तर त्या क्रमांकाच्या सर्वात जवळच्या क्रमांकाला विजेता म्हणून घोषित केले जाते. नॅशनल लॉटरी जॅकपॉटच्या शेवटचा विक्रम यापूर्वी १९९६ मध्ये बनला होता. त्यावेळी तीन विजेत्यांत ४२ दशलक्ष पाऊंड (४० अब्ज रुपये) वाटण्यात आले होते. ताज्या घटनेतही शेवटच्या काही मिनिटांत तिकीटांची मागणी अचानक वाढली होती.

Web Title: The two winners have a jackpot of Rs 64 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.