भारतीय वंशाच्या दोन महिला अमेरिकेत न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:15 AM2020-01-08T05:15:36+5:302020-01-08T05:15:42+5:30
न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासिनो यांनी भारतीय वंशाच्या दोन महिलांची फौजदारी आणि दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
न्यूयॉर्क : न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासिनो यांनी भारतीय वंशाच्या दोन महिलांची फौजदारी आणि दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायाधीश अर्चना राव यांना फौजदारी न्यायालयात आणि न्यायाधीश दीपा अंबेकर यांना दिवाणी न्यायालयात नियुक्त करण्यात आले आहे.
राव यांना यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. न्यूयॉर्क काऊंटी जिल्हा अॅटर्नी कार्यालयात त्या १७ वर्षांपासून सेवा देत आहेत.
अंबेकर यांना मे २०१८ मध्ये दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. महापौरांनी कौटुंबिक न्यायालय, फौजदारी न्यायालय, दिवाणी न्यायालयात २८ नियुक्त्या केल्या आहेत.