सरकारच्या निर्णयाने कर्मचारी खूश; आठवडाभरात केवळ साडेचार दिवसच काम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:38 AM2021-12-08T06:38:22+5:302021-12-08T06:38:50+5:30
३४.२ लाख भारतीय सध्या यूएईमध्ये काम करत आहेत. त्यातील काही जणांना याचा फायदा होऊ शकतो.
अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातने कर्मचाऱ्यांवरील ताण करणारा आणि त्यांचं आयुष्यमान कसे सुधारणारा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीपासून तिथे अधिकृत कार्य सप्ताह केवळ साडेचार दिवसांचा असणार आहे. सर्व सरकारी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना आठवड्यात केवळ साडेचार दिवस इतकेच काम करावे लागेल. देशातील कार्यसप्ताह अधिकृतपणे पाच दिवसांपेक्षाही कमी करणारा संयुक्त अरब अमिरात हा जगातील पहिला देश ठरला आहे.
असे कमी होत गेले दिवस
६ दिवस
१९७१ - १९९९
५ दिवस
१९९९ - २०२१
४.५ दिवस
२०२२ ते पुढे
कसे असतील कामाचे दिवस?
आठवड्याची सुरुवात सोमवारपासून.
गुरुवारपर्यंत पूर्ण चार दिवस काम.
शुक्रवारी कामाचा अर्धा दिवस.
शनिवार-रविवार वीकेंड.
शुक्रवार दुपारपासून वीकेंड सुरु.
शुक्रवारी लोकांना घरून काम करण्याचा पर्याय असेल किंवा सोयीनुसार कामाचे तास पूर्ण करता येतील.
३४.२ लाख भारतीय सध्या यूएईमध्ये काम करत आहेत. त्यातील काही जणांना याचा फायदा होऊ शकतो. भविष्यात हा निर्णय खासगी क्षेत्रासाठीही लागू होऊ शकतो. त्यावेळी लाखो भारतीयांना त्याचा फायदा होईल.
जगात असे कुठे आहे?
फ्रान्समध्ये २००० सालापासून आठवड्याला ३५ तास काम करावे लागते. आठ तासांची शिफ्ट गृहित धरली तर तिथेही ४.५ दिवसांचाच आठवडा आहे.