Afghanistan Crisis: अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी नेमके कुठे आहेत? माहिती आली समोर, 'या' देशानं दिलाय आसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:04 PM2021-08-18T20:04:06+5:302021-08-18T20:05:12+5:30

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानचं एक एक शहर तालिबानी काबिज करत असताना देशाचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पळ काढला होता.

UAE Ministry of Foreign Affairs confirms president Ashraf Ghani and his family into the country on humanitarian grounds | Afghanistan Crisis: अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी नेमके कुठे आहेत? माहिती आली समोर, 'या' देशानं दिलाय आसरा

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी नेमके कुठे आहेत? माहिती आली समोर, 'या' देशानं दिलाय आसरा

googlenewsNext

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानचं एक एक शहर तालिबानी काबिज करत असताना देशाचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पळ काढला होता. त्यानंतर तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करत राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतलं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी तालिबान्यांपासून बचाव करण्यासाठी नेमकं कोणत्या देशात आश्रयाला गेले आहेत याची काही माहिती समोर येऊ शकली नव्हती. पण आता अशरफ गनींच्या वास्तव्याचा ठावठिकाणा लागला आहे. संयुक्त अरब अमिरातनं (यूएई) अशरफ गनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचं अधिकृतरित्या मान्य केलं आहे. (UAE Ministry of Foreign Affairs confirms president Ashraf Ghani and his family into the country on humanitarian grounds)

देशाचा खजाना चोरून नेला; इटरपोलनं अशरफ गनींना अटक करावी; अफगाण दुतावासाची मागणी

समोर आलेल्या माहितीनुसार अशरफ गनी सध्या अबू धाबीमध्ये वास्तव्याला असून त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील आहेत. अशरफ गनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानवतेच्या आधारावर आश्रय देण्यात आल्याचं यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अफगाणिस्तानवरतालिबानचा वाढता प्रभाव पाहून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला होता. तसंच जाताना त्यांनी आपल्यासोबत चार गाड्याभरून पैसे आणि चॉपर नेल्याचा दावा रशियन दुतावासानं प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं केला होता. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासानं इंटरपोलला अशरफ गनी यांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. दुतावासानं इंटरपोलकडे अशरफ गनी आणि हमदुल्लाह मोहिम, तसंच फजल अहमद फाजली यांना सार्वजनिक संपत्ती चोरण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच ती संपत्ती अफगाणिस्तानला परत करण्यात यावी असंही म्हटलंय. टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Read in English

Web Title: UAE Ministry of Foreign Affairs confirms president Ashraf Ghani and his family into the country on humanitarian grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.