Egypt Minister Viral Speech : "मुस्लीम समाजानं वेगळ्या देशाचं स्वप्न पाहू नये, आपल्या देशाप्रती प्रामाणिक रहावं"; इजिप्तच्या मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:27 AM2022-05-11T11:27:09+5:302022-05-11T11:30:50+5:30
गोमा म्हणाले, मुस्लिमांनी आपला देश, झेडा आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करायला हवा.
संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे नुकतेच विश्व मुस्लीम समुदाय परिषदेचे (TWMCC) आयोजन करण्या आले होते. या पिरषदेत अनेक देशांतील मुस्लीन नेत्यांनी भाग घेतला होता. यावेळी, इजिप्तच्या मंत्र्याने केलेले भाषण सध्या संपूर्ण जगात व्हायरल होत आहे आणि त्यावर चर्चाही सुरू आहे. मुस्लीम समुदायाने आपल्या देशाप्रती प्रामाणिक रहायला हवे, असे इजिप्तच्या मंत्र्याने म्हटले आहे.
'मुस्लिमांनी आपल्या देशाचा सन्मान करावा' -
परिषदेत इजिप्तचे मंत्री डॉ. मोहम्मद मोख्तार गोमा (Dr. Mohamed Mokhtar Gomaa) म्हणाले, मुस्लीम लोक ज्या देशात राहत असतील त्यांनी त्या देसाचा सन्मान करायला हवा. मग भलेही त्या देशात मुस्लीम समाज अल्पसंख्यक असो अथवा बहुसंख्याक. एवढेच नाही, तर जगातील सर्व देशांतील मुस्लिमांना एक झेडा, एक देश आणि एका शासकंतर्गत आणणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले.
'दहशतवादाचा सामना करण्यासाठी एक आहोत' -
गोमा म्हणाले, मुस्लिमांनी आपला देश, झेडा आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करायला हवा. याच बरोबर, दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत. मुस्लिमांनी आपल्या देशाप्रती प्रामाणिक राहायला हवे, अेही ते म्हणाले.
H.E. Dr. Mohamed Mokhtar Gomaa Minister of Awqaf of Egypt, during the international conference "#Islamic_Unity: Concept, Opportunities and Challenges": “We stand united in the face of extremism and terrorism”#The_World_Muslim_Communities_Council@drmokhtargomaapic.twitter.com/QuVuMlm22r
— Muslim Communities (@WMuslimCC) May 8, 2022
'अतिरेक्यांचा अजेंडा सर्वांसमोर ठेवा'
मुस्लीम विद्वानांनी अतिरेकी गटांचा अजेंडा सर्वांसमोर ठेवायला हवा. आपण अशा अतिरेकी गटांचा सामना करायला हवा, जे इस्लामचा बुरखा परिधान करून धर्माला विकृत बनवत आहेत. आम्ही दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्रित आहोत. एवढेच नाही, तर आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो नाही, तर लोकही आपल्या धर्माचा सन्मान अथवा आदर करणार नाहीत, असेही गोमा म्हणाले.