ब्रिटनमध्ये संसदेबाहेर दहशतवादी हल्ला, 5 ठार 40 जखमी

By Admin | Published: March 22, 2017 08:39 PM2017-03-22T20:39:37+5:302017-03-23T07:21:08+5:30

ब्रिटनच्या(युनायडेट किंगडम) संसदेबाहेर गोळीबार झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले आहेत.

UK: 5 dead in terror attack in Britain | ब्रिटनमध्ये संसदेबाहेर दहशतवादी हल्ला, 5 ठार 40 जखमी

ब्रिटनमध्ये संसदेबाहेर दहशतवादी हल्ला, 5 ठार 40 जखमी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि, 22 - ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. आज संध्याकाळी संसदेबाहेरच्या परिसरात पादचाऱ्यांना कारने चिरडण्याची, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत.ठार झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा सामवेश आहे. दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या संसदेबाहेरील वेस्टमिंस्टर ब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.  काही जणांना कारने चिरडण्यात आले. तसेच चाकूने भोकसण्याची घटनाही घडली.  यात 40 जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, गोळीबार झाल्याचा मोठा आवाज आल्याची माहिती येथील काही नागरिकांनी दिली आहे. 
 
दरम्यान, गोळीबार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संसदेचा परिसर बंद करण्यात आला.. तसेच, या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले असून, संसदेतमध्ये बंदुकधारी पोलीस दाखल झाले आहेत. हल्लेखोराने एका पोलिसाला चाकू मारल्याचे समजते. त्याचबरोबर पंतप्रधान तेसेसा मे सुखरूप असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. या गोळीबारात जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
दरम्यान गोळीबार झाला तेव्हा संसदेमध्ये ब्रिटीश पंतप्रधानांसह 200 खासदार उपस्थित होते. या घटनेमुळे लंडनमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, ब्रिटनमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे.   
 

Web Title: UK: 5 dead in terror attack in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.