ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 11:14 AM2021-12-23T11:14:44+5:302021-12-23T11:15:11+5:30

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटननं कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या बुस्टर डोसची मोहिमही जलद करण्याची तयारी सुरू केलीये.

uk approves covid 19 vaccine for children aged five to 11 as new daily cases cross 1 lakh mark | ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी

फोटो सौजन्य - रॉयटर्स

googlenewsNext

कोरोनाचe (Coronavirus) नवीन आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिअंट ओमायक्रॉन (Omicron Variant) समोर आल्यानंतर ब्रिटनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये यादरम्यान दररोज १ लाखांच्यावर नव्या रुग्णांची भर पडत आहे. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. दरम्यान, ब्रिटीश नियामकांनी ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी Pfizer ची कोविड-19 लस वापरण्यास मान्यता दिली आहे.

हा निर्णय ब्रिटनने अशा वेळी घेतला आहे जेव्हा तेथील सरकारने संक्रमित लोकांसाठी आवश्यक आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) ने सांगितलं की, फायझर-बायोएनटेकची लस ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी 'सुरक्षित आणि प्रभावी' असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या वयोगटातील मुलांना धोका कमी असल्याचे सिद्ध करणारे पुरावे मिळाले असल्याची माहिती ब्रिटीश नियामक एमएचआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जून रेन यांनी दिली.

ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी, ब्रिटन लसीच्या बूस्टर डोससाठी मोहीम तीव्र करण्याची तयारी करत आहे. ब्रिटनने बुधवारी लसीच्या तिसऱ्या डोसच्या 30 दशलक्ष डोसचा टप्पा ओलांडला. या वर्षाच्या अखेरीस सर्व प्रौढांना लसीचे अतिरिक्त डोस उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने कोरोनाची लागण झालेल्या लोकांसाठी सेल्फ आयसोलेशनचा कालावधी १० दिवसांवरून सात दिवसांवर आणण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: uk approves covid 19 vaccine for children aged five to 11 as new daily cases cross 1 lakh mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.