Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 07:24 PM2021-05-28T19:24:03+5:302021-05-28T19:25:06+5:30

Corona Vaccination : सिंगल शॉट लशीमुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणात मोठा फरक पडेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

UK Approves Single Shot Johnson & Johnson Covid Vaccine | Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

Next
ठळक मुद्देअमेरिकेत झालेल्या ट्रायल दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सनची लस सौम्य आणि तीव्र कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 72 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले होते.

लंडन : ब्रिटन सरकारने फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला शुक्रवारी मान्यता दिली. या निर्णयामुळे यूकेच्या यशस्वी कोरोना लसीकरण कार्यक्रमाला आणखी बळकटी मिळेल. आता आमच्याजवळ चार सुरक्षित लस आहेत, ज्याद्वारे लोकांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक म्हणाले. तसेच, सिंगल शॉट लशीमुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणात मोठा फरक पडेल, असे सरकारचे म्हणणे आहे. (UK Approves Single Shot Johnson & Johnson Covid Vaccine)

ब्रिटनने या लसीच्या 2 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. अमेरिकेत झालेल्या ट्रायल दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सनची लस सौम्य आणि तीव्र कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 72 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले होते. ब्रिटनने आतापर्यंत 6.2 कोटी लसीचे डोस लोकांना दिले आहेत. जास्तकरून डोस ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझर या लसीचे आहेत. याशिवाय, मोडर्नाच्या लसीला देखील परवानगी देण्यात आली आहे.

(ब्रिटन ऑगस्टपर्यंत कोरोनामुक्त होणार, वॅक्सिन टास्कफोर्स प्रमुखांचा दावा)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. येथील रुग्णांमध्ये कोरोनाचा B1.617.2 हा व्हेरिएंट आढळून आला आहे. B1.617.2 या व्हेरिएंटचे वाढते प्रकरण लक्षात घेता काही भागात पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर टीका सुरू झाली आहे. ब्रिटनने मंगळवारी विना-अनिवार्य प्रवासावर बंदी घालण्यासाठी आणि कोरोनाच्या B1.617.2 या व्हेरिएंटवर मात करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे येथील बोरिस जॉन्सन सरकारवर 'गोंधळ आणि अनिश्चितता' असल्याचा आरोप केला जात आहे.


कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा
ब्रिटनमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी टोचण्यात येणार लस कोरोना व्हायरसच्या B1.617.2 व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यास कमी प्रभावी आहे, असा दावा ब्रिटनमधील तज्ज्ञांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एंथनी हार्डेन म्हणाले होते की, देश अनलॉक करण्याच्या योजनेत अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण कोरोनाचा हा व्हेरिएंट किती वेगाने प्रादुर्भाव होईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लस नवीन व्हेरिएंटच्या विरोधात कमी प्रभावी असू शकते असा दावाही त्यांनी केला होता.

Web Title: UK Approves Single Shot Johnson & Johnson Covid Vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.