ब्रिटनच्या मंत्रिमंडळात दोन भारतीयांचा समावेश, महत्त्वाची खातीही मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:25 AM2018-01-11T01:25:17+5:302018-01-11T01:25:33+5:30
ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या व मूळ भारतीय वंशाचे असलेल्या दोन खासदारांचा पंतप्रधान तेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक तसेच सुएला फर्नांडिस अशी या दोन खासदारांची नावे आहेत. ते दोघे ३७ वर्षांचे आहेत.
लंडन : ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या व मूळ भारतीय वंशाचे असलेल्या दोन खासदारांचा पंतप्रधान तेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक तसेच सुएला फर्नांडिस अशी या दोन खासदारांची नावे आहेत. ते दोघे ३७ वर्षांचे आहेत.
ऋषी सुनक व सुएला फर्नांडिंस भारतीय वंशाचे असले तरी दोघांचा जन्म तिथेच झाला आहे. सुएला या मूळ गोव्याच्या रहिवासी आहेत.
ऋषी सुनक हे २०१५ साली पार्लमेंटमध्ये निवडून आले होते. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षामध्ये त्यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. गृहनिर्माण, स्थानिक स्वराज्य संस्था या खात्याचे राज्यमंत्रीपद
त्यांना पंतप्रधान तेरेसा मे यांनी
दिले आहे. ब्रेक्झिेटशी संबंधित खात्याचे मंत्रीपद सुएला फर्नांडिस यांना देण्यात आले आहे. ब्रेक्झिटचा फर्नांडिस यांनी धडाडीने प्रचार
केला होता.
ऋषी सुनक यांचे आॅक्सफर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठांमध्ये उच्च
शिक्षण झाले आहे. सुनक हे ब्रेक्झिटचे कट्टर समर्थक आहेत. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यास आपले व्यापारविषयक धोरण तो अधिक प्रभावीपणे राबवू शकेल असे मत ऋषी सुनक व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)
शर्मांकडे रोजगार खाते
राष्ट्रकुल परिषदेचे ब्रिटनने पुनरुज्जीवन करण्याची गरज असून भारतासारख्या देशांबरोबरचे बाजारपेठीय व व्यापारी संबंध ब्रिटनने सुधारायला हवेत असे परखड मत व्यक्त करणाºया सुएला फर्नांडिस यांनाही महत्त्वाचे खाते देऊन पंतप्रधान तेरेसा मे यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे. मूळ भारतीय वंशाचे एक आलोक शर्मा यांच्याकडे मे यांच्या मंत्रिमंडळात याआधी गृहनिर्माण खाते होते. त्यांना आता मंत्रिमंडळ फेरबदलात रोजगार खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.