विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 04:16 PM2019-04-08T16:16:16+5:302019-04-08T16:27:35+5:30
सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
लंडन - सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या याने दाखल केलेली याचिका इंग्लंडमधील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मिळालेली मंजुरी हे भारतीय तपासयंत्रणांना मिळालेले मोठे यश असून, आता माल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसांतच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.
UK Court rejected on April 5 the plea of Vijay Mallya against his extradition order. (File pic) pic.twitter.com/ag2mVpM7ZX
— ANI (@ANI) April 8, 2019
बँकांचे सुमारे नऊ हजार रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशात फरार झाला होता. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती समोर आल्यापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील याचिकेवर लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरू होती.
दरम्यान, विजय माल्या याने काही दिवसांपूर्वी सरकारी बँकांना ऑफर दिली होती. सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर माल्याने दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कर्जदात्यांकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनीता गोयल यांनी पद सोडले होते.