मोठी बातमी! ब्रिटनचे डेप्युटी पीएम डॉमिनिक राब यांचा राजीनामा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 03:42 PM2023-04-21T15:42:39+5:302023-04-21T15:44:22+5:30
डॉमिनिक राब यांच्यावर व्हाईटहॉलमधील न्याय मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये धमकावल्याचा आरोप होता.
ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होत असतानाच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राब यांच्यावर व्हाइटहॉलमधील न्याय मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये धमकावल्याचा आरोप होता, त्यानंतर त्यांनी न्याय सचिव आणि उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ज्येष्ठ कंझर्व्हेटिव्ह खासदारावर लोकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता. याबाबत अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. राब लोकांना खूप धमक्या देत होच्या यामुळे समोरची व्यक्ती अनेकदा रडल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Russia Ukraine War : रशियाची मोठी चूक, आपल्याच भागावर पाडला बॉम्ब; झालं मोठं नुकसान, जमीनही धसली
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक सरकारच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. याआधी पत्नी अक्षता मूर्तीला आर्थिक लाभ देण्याच्या कारणावरून ते विरोधकांच्या निशाण्यावर होते. आता हा राजीनामा सुनक यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. त्यांनी राब यांना पदावर का राहू दिले, असे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होऊ शकतात. अॅडम टोले केसी या आघाडीच्या बॅरिस्टरनेही याबाबत तपास केला आहे. यावेळी राब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारींवर जोरदारपणे लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.