UK Election Campaign: ऋषी सुनक ब्रिटनमध्ये वापरत आहेत केजरीवालांचा फॉर्म्युला? केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 09:29 PM2022-08-09T21:29:30+5:302022-08-09T21:30:21+5:30
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या सुनक आणि परराष्ट्रमंत्री लिज ट्रस यांच्या प्रचारात वीज बील हा एक मुख्य मुद्दा आहे.
ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी मंगळवारी, आपण देशाचे पुढचे पंतप्रधान झालो, तर घरांच्या वाढत्या वीज बिलांचा सामना करण्यासाठी लोकांना मदत म्हणून अधिक अर्थ सहाय्य करू, अशी घोषणा केली आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांमध्ये 42 वर्षीय भारतीयवंशाच्या सुनक यांचाही समावेश आहे. त्यांनी लोकांच्या आर्थिक मदत करण्यासाठी कर्ज मर्यादित करून बचत करण्यावर भर दिला आहे.
केजरीवालांनीही दिले होते असे आश्वासन -
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी साधारणपणे अशाच स्वरुपाचे आश्वासन दिले होते. त्यांचे हे आश्वासन प्रभावीही ठरले होते. येथील यशानंतर, केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्येही, निवडणूक आश्वासन म्हणून हाच फॉर्म्युला वापरला. येथील निवडणुकीत मोफत वीज देण्याचे आश्वासन देत आम आदमी पक्षाने पंजाबची निवडणूकही जिंकली.
ब्रिटनमध्ये वाढते वीज बील मोठा मुद्दा -
ब्रिटेनमध्ये वीजेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कॉनवॅल इनसाइट या संस्थेने, वाढते वीज बील हे हिवाळ्याच्या दिवसात अपेक्षेपेक्षा अधिक वाढू शकते, असा अदाज वर्तवला आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या सुनक आणि परराष्ट्रमंत्री लिज ट्रस यांच्या प्रचारात वीज बील हा एक मुख्य मुद्दा आहे.