'या' देशात आलाय अंडरविअरचा मोठा शॉर्टेज, चौपट भावाने ब्लॅक मार्केटमधून घेत आहेत लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 03:57 PM2021-10-08T15:57:48+5:302021-10-08T15:58:02+5:30

स्टॉक कमी असल्याने दुकानदार शिल्लक राहिलेला माल तिप्पट भावाने विकत आहेत. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत.

UK facing underwears and pajamas shortage people buying pants from black market | 'या' देशात आलाय अंडरविअरचा मोठा शॉर्टेज, चौपट भावाने ब्लॅक मार्केटमधून घेत आहेत लोक

'या' देशात आलाय अंडरविअरचा मोठा शॉर्टेज, चौपट भावाने ब्लॅक मार्केटमधून घेत आहेत लोक

Next

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, जी अंडरविअर १०० रूपयात मिळते ती आता तुम्हाला ५०० रूपयात घ्यायची आहे? अर्थातच तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल. पण सध्या यूकेमध्ये लोक असंच करत आहेत. त्यामागचं कारणही तसंच आहे. यूकेमध्ये अलिकडे अंडरविअर्स आणि पायजाम्यांचा शॉर्टेज आला आहे. स्टॉक कमी असल्याने दुकानदार शिल्लक राहिलेला माल तिप्पट भावाने विकत आहेत. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पण वस्तूच अशी आहे की, लोक जास्त भावातही घेत आहेत.

ब्रिटनमध्ये आधी इंधन आणि मांसाची कमतरता आल्याची बातमी आली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की, इथे पॅंट्सची कमतरता आली आहे. दुकानांमध्ये अंडरविअर्स, हाफ पॅंट्स आणि पायजामे कमी झाले आहेत. इंडस्ट्री एक्सपर्ट सांगतात की, ख्रिसमसच्या तोंडावर आता बॉक्सर्स लॉंन्जरी आणि पायजाम्यांची किंमत बरीच वाढेल. याचं मुख्य कारण आहे ब्रिटनमध्ये आलेलं वादळ.

खराब वातावरणामुळे कॉटनच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कॉटनच्या किंमतीत गेल्या १० वर्षात सर्वात जास्त वाढ झाली आहे. सध्या कॉटनचे भाव ४० पटीने वाढले आहेत. त्यासोबतच कोरोनामुळे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ९ पटीने वाढले आहेत. यामुळे शिपिंग कंटेनर्सच्या भावांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे कपड्यांची कमतरता जाणवत आहे. डिमांडनुसार, सप्लाय होत नसल्याने  किंमती वाढल्या आहेत.

एका अंडरविअर रिटेलरने सांगितलं की, फेस्टिव सीझनमध्ये ही कमतरता चिंतेचा विषय आहे. आता सेलचा सीझन होता. पण कपडेच कमी असल्याने ग्राहकांना परतावं लागलं. जेवढा माल आता आहे तेवढा जास्त किंमतीत विकणं मजबूरी आहे. असं नाही की यूकेमध्ये केवळ याच सेक्टरमध्ये नुकसान होत आहे. अनेक सेक्टरमध्ये वाईट अवस्था आहे. 
 

 

Web Title: UK facing underwears and pajamas shortage people buying pants from black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.