सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:04 PM2024-07-04T22:04:15+5:302024-07-04T22:04:47+5:30

ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत असून, उद्या निकाल लागेल. यावेळी ऋषी सुनक यांच्याविरोधा कीर स्टार्मर निवडणुकीच्या मैदानात आहेत.

UK-general-election-2024-conservative-party-labour-rishi-sunak-and-keir-starmer | सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...

सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...

UK General Election : ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या विरोधात लेबर पक्षाचे कीर स्टार्मर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत देशभरातील 5 कोटी मतदार खासदारांची निवड करतील. विशेष म्हणजे, दरवेळेप्रमाणे यंदाही दोन्ही पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हिंदूंना/भारतीयांना आकर्षित करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

ब्रिटीश निवडणुकीत हिंदू मतदारांची ताकद किती आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, मतदानाच्या काही दिवस आधी, म्हणजेच 28 जून रोजी लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात पूजा केली. त्यानंतर लगेचच, 30 जून रोजी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनीदेखील मंदिरात पूजा केली. दरम्यान, ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे अंदाजे 18 लाख लोक राहतात. त्यामुळे दोन्ही पक्ष भारतांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या निवडणुकीत भारतीयांनी कोणाला मतदान केले?
आकडेवारीवर नजर टाकली तर 2010 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 61 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला पाठिंबा दिला होता, फक्त 24 टक्के भारतीय कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या बाजूने होते. त्यानंतर, 2015 मध्ये 57 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला आणि 31 टक्के भारतीयांनी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान केले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत दोघांमधील फरक लक्षणीयरीत्या कमी झाला. 30 टक्के भारतीयांनी लेबर पक्षाला आणि 24 टक्के भारतीयांनी कंझर्व्हेटिव्हला मतदान केले होते.

यावेळी भारतीय कोणाला पाठिंबा देत आहेत?
एका सर्वेक्षणनुसार, यावेळी भारतीय मतदार सुनक यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षावर नाराज आहेत. 65% भारतीय मतदार सुनक यांच्या पक्षाच्या विरोधात आहेत. भारतीय मतदारांचे म्हणणे आहे की, सुनक यांच्या कार्यकाळात भारतीयांच्या बाजूने कोणतेही मोठे पाऊल उचलले गेले नाही.

निकाल कधी येईल
दरम्यान, ब्रिटनमध्ये 6 महिन्यांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज (4 जुलै) सकाळीच मतदानाला सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार 5 जुलै रोजी मतदानाची मतमोजणी सुरू होईल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होतील. ब्रिटनमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जाते. फक्त ब्रिटनचे नागरिकच नाही, तर भारतीय, पाकिस्तानी, ऑस्ट्रेलियन यांसारख्या देशांतील नागरिकही निवडणुकीत मतदान करतात.

Web Title: UK-general-election-2024-conservative-party-labour-rishi-sunak-and-keir-starmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.