Coronavirus: ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 09:53 AM2020-03-11T09:53:31+5:302020-03-11T09:57:10+5:30

डॉरीस यांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची भीती

UK Health Minister Nadine Dorries Tests Positive For Coronavirus kkg | Coronavirus: ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाची लागण

Coronavirus: ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण; निवेदनातून दिली माहितीआरोग्य मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली कशी?; आरोग्य मंत्रालयाकडून शोध सुरूडॉरिस यांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची भीती

लंडन: जगभरात कोरोनामुळे तब्बल साडे तीन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून जवळपास शंभर देशांमध्ये कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरातले देश कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना करत आहेत. सर्वच देशांमधील सरकारं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पावलं उचलत असताना ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटिश खासदार आणि आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांनी मंगळवारी एक पत्रक जारी करुन कोरोनाची बाध झाल्याची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी घरात कुटुंबातल्या इतर सदस्यांपासून दूर राहत आहे, अशी माहिती डॉरीस यांनी निवेदनातून दिली. डॉरीस यांना कोरोनाची बाधा नेमकी कुठे आणि कशी झाली, याचा शोध आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. 

नदीन डॉरीस या कोरोनाची लागण झालेल्या ब्रिटनमधल्या पहिल्या राजकीय नेत्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी डॉरीस यांना गेल्या काही दिवसांत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इतरांनाही कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांमध्ये डॉरीस यांनी शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचाही समावेश आहे. 

नदीन शुक्रवारी आजारी पडल्या. त्याच दिवशी त्यांनी कोरोनाला विमा संरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्याचा निर्णय घेतला. नदीन यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य सल्ला आणि सहकार्य दिल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३७३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६ जणांनी जीव गमावला आहे. 
 

Web Title: UK Health Minister Nadine Dorries Tests Positive For Coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.