बापरे! लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्याला झाला कोरोनाचा संसर्ग; धडकी भरवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 08:32 AM2021-01-14T08:32:20+5:302021-01-14T08:39:42+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: फायजरची कोरोना लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा हैराण करणारा प्रकार लंडनमध्ये समोर आला आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्ताच्या संख्येने आठ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अशीच एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. फायजरची कोरोना लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा हैराण करणारा प्रकार लंडनमध्ये समोर आला आहे.
डेविड लॉन्गडन असं या आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव आहे. डेविड साऊथ वेल्स येथील ब्रिजेंडीमधील प्रिंसेज ऑफ वेल्स रुग्णालयामध्ये कार्यरत आहे. डेविडने दिलेल्या माहितीनुसार त्याने आठ डिसेंबर रोजी फायजरच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे म्हटलं आहे. डेविडचे कोरोना रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, डेविडला पाच जानेवारी रोजी फायजरच्या लसीचा दुसरा डोस देणं अपेक्षित होतं. मात्र सरकारने ऐनवेळी नियमांमध्ये बदल केला. देशातील जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यासाठी पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आलेल्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.
A&E nurse catches Covid after his second vaccination was postponed when Government changed jab ruleshttps://t.co/Z067x6sePE
— Daily Mail U.K. (@DailyMailUK) January 12, 2021
सध्या डेविडला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लस घेतल्यानंतरही डेविडला कोरोनाचा संसर्ग कसा झाला या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्याचं काम डॉक्टरांच्या टीमसमोर आहे. मी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही सरकारी कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग झाला यावरुन सरकारला पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची किती चिंता आहे हे दिसून येत असल्याचे सांगत डेविडने आपली नाराजी व्यक्त केली आहे. डेविडने डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार तो मागील अनेक दिवसांपासून आपत्कालीन विभागामध्ये काम करत होता. या विभागामध्ये रोज अनेक कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येत आहे.
CoronaVirus News : कोरोना व्हायरससंबंधित महत्त्वाच्या संशोधनाच्या शेकडो पानांची माहिती केली डिलीटhttps://t.co/omC8Nj7kk3#CoronaVirusUpdates#Coronavirus#China
— Lokmat (@MiLOKMAT) January 12, 2021
डेविड ज्या ब्रिजेंडीमधील रुग्णालयात काम करतो आहे तो प्रदेश कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या प्रदेशांपैकी एक आहे. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटत असल्याचंही डेविडने म्हटलं आहे. माझ्यामुळे कुटुंबातील कोणाला कोरोनाचा संसर्ग तर झाला नसेल ना अशी भीती आपल्याला वाटत असल्याचं म्हटलं आहे. माझ्या पार्टनरला मधुमेहाचा त्रास असल्याने तिला कोरोनाचा संसर्ग झाल्यास जास्त त्रास सहन करावा लागू शकतो, असंही डेविड म्हणाला. कोरोनाची लस घेतल्यानंतर मला कोरोनाचा संसर्ग होणार नाही असा विश्वास होता. डेविडची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या डेव्हिडला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मला डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास होता असंही डेविडने स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! Pfizer ची कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी डॉक्टरचा मृत्यू
कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचामृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली. त्याआधी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. इतकंच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता. कोरोना लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांची प्रकृती बिघडल्याचा दावा पत्नीने केला आहे.
Corona Vaccine : "डॉक्टरांची प्रकृती ठणठणीत होती, कोणताही आजार नव्हता मात्र लस घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली", पत्नीचा दावा https://t.co/Br2hYr8Gmk#coronavirus#CoronaVaccine#PfizerVaccine#Pfizer
— Lokmat (@MiLOKMAT) January 8, 2021
कोरोना लस घेतल्यानंतर डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका, कुटुंबीयांनी केली चौकशीची मागणी
मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला आहे. या महिला डॉक्टरने लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना अशक्तपणा, डोकेदुखी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. कार्ला सेसेलिया पेरेज असं महिला डॉक्टरचं नाव असून त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेक्सिकोच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लसीचा दुष्परिणाम झालेल्या डॉक्टर कार्ला पेरेझ यांच्या मेंदूत आणि मणक्यात सूज आली होती. त्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
Corona Vaccine : मेड इन चायना कोरोना लसीबाबत चीनी डॉक्टरचा धक्कादायक खुलासाhttps://t.co/wNnq9yvylt#coronavirus#CoronaVaccine#China
— Lokmat (@MiLOKMAT) January 8, 2021