CoronaVirus News : ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणासाठी तयारी सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन! 

By ravalnath.patil | Published: October 26, 2020 06:22 PM2020-10-26T18:22:46+5:302020-10-26T18:28:46+5:30

CoronaVirus News : ऑक्सफोर्डच्या कोरोनावरील लसीला AZD1222 or ChAdOx1 nCoV-19 असे नाव देण्यात आले आहे.

UK Hospitals Preparing For Coronavirus Vaccination From November Know Full Plan | CoronaVirus News : ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणासाठी तयारी सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन! 

CoronaVirus News : ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणासाठी तयारी सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन! 

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरस लसीकरणादरम्यान सैन्य तैनात केले जाईल, असे ब्रिटन सरकारने सांगितले. कोरोनाची लस लागू करता यावी, यासाठी एनएचएस आणि जवानांना एकत्र आणण्याची योजना आखली जात आहे.

लंडन : ऑक्सफोर्डची लस कोरोनावर मात करण्यासाठी गेम चेंजर मानली जात आहे. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये या लसीचे प्रभावी परिणाम दिसून आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ११ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कोरोना संकटामुळे जगातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, ऑक्सफोर्ड, फायझर आणि बायोटेकच्या कोरोना व्हायरसवरील लस लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे.

ऑक्सफोर्डच्या कोरोनावरील लसीला AZD1222 or ChAdOx1 nCoV-19 असे नाव देण्यात आले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने ही लस अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या सहकार्याने तयार केली आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सिस्टमकडून (एनएचएस) ख्रिसमसपर्यंत देशात ५ ठिकाणी लस देण्याची सुविधा केली जाणार आहे. यासाठी या ठिकाणी एनएचएसचे हजारो कर्मचारी तैनात असतील. दररोज किमान दहा हजार लोकांना कोरोना लसी देण्याची योजना आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र द सनच्या वृत्तानुसार, लसीकरणादरम्यान कोरोना संसर्गाचा जास्त धोका असलेल्या लोकांना सर्वात आधी बोलावले जाईल. कोरोनाची लस देण्यासाठी लीड्स, हॉल आणि लंडनमध्ये केंद्रे उभारली जातील. या केंद्रांवर प्रशिक्षणार्थी परिचारिका व पॅरामेडीक तैनात केले जातील. याशिवाय मोबाईल युनिटही तयार केल्या जातील जे गरजू लोकांकडे आणि केअर होममध्ये जातील.

कोरोना व्हायरस लसीकरणादरम्यान सैन्य तैनात केले जाईल, असे ब्रिटन सरकारने सांगितले. कोरोनाची लस लागू करता यावी, यासाठी एनएचएस आणि जवानांना एकत्र आणण्याची योजना आखली जात आहे. ही लस आशेचा किरण आहे, असे यूकेचे आरोग्यमंत्री म्हणाले. दरम्यान, कोरोनावरील लसीच्या शर्यतीत ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाची लस अग्रेसर आहे. एप्रिलपासून या लसीच्या चाचण्या सुरू आहेत.

ब्रिटन सरकारने लसीला परवानगी देण्यापूर्वी १० कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. ऑक्सफोर्ड लस एका व्यक्तीला  दोनवेळा द्यावी लागते. यामुळे ब्रिटन सरकारची चिंता आणखी वाढली आहे. या प्रस्तावात असे म्हटले आहे, की आरोग्य कर्मचार्‍यांव्यतिरिक्त, आरोग्य सेवेशी संबंधित इतर डॉक्टरांची सुद्धा लस देण्यास मदत घेतली जाणार आहे. केअर होममध्ये राहणाऱ्या लोकांनंतर ८० वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना आणि एनएचएस कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. यानंतर ६५ वर्षांच्या लोकांना आणि तरुणांना ही लस दिली जाईल.
 

Web Title: UK Hospitals Preparing For Coronavirus Vaccination From November Know Full Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.