टीपू सुल्तानच्या सिंहासनातील सोन्याच्या वाघासाठी कस्टमर शोधत आहे ब्रिटन, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 01:10 PM2021-11-13T13:10:15+5:302021-11-13T13:11:34+5:30
ब्रिटन १८व्या शतकात टीपू सुल्तानच्या सोन्यापासून तयार सिंहासनाचा भाग असलेलं सोन्याचं वाघाचं मुंडकं खरेदी करण्यासाठी खरेदार शोधत आहे.
टायगर ऑफ म्हैसूर म्हणून ओळख असलेले टीपू सुल्तान (Tipu Sultan) यांच्या नावाने ब्रिटीश(UK) घाबर होते. म्हैसूरचे शासक टीपू सुल्तान जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत इंग्रजांचे सर्वात मोठे वैरी बनून राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी म्हैसूरवर ताबा मिळवला आणि त्यांचा खजिना लुटला. आता ब्रिटन १८व्या शतकात टीपू सुल्तानच्या सोन्यापासून तयार सिंहासनाचा भाग असलेलं सोन्याचं वाघाचं मुंडकं (Tiger Gold Head) खरेदी करण्यासाठी खरेदार शोधत आहे.
हे सोन्यापासून तयार वाघाचं मुंडकं आहे आणि यात हिरे लावले आहेत. यात रूबी आणि पन्नासारखे दुर्मीळ रत्न लावले आहेत. याची किंमत १५ कोटी रूपये ठेवण्यात आली आहे. जर खरेदीदार दुसऱ्या देशातील असेल तरच हा सोन्याचा वाघ ब्रिटनच्या बाहेर जाऊ शकतो. असं सांगितलं जातं की, असे ५ वाघ आहेत आणि यावर सोन्यानेच काहीतरी लिहिलं आहे. ते काय याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. मुळात असे ८ सोन्याचे वाघ तयार करण्यात आले होते.
टायगर टीपू सुल्तानचे प्रतीक मानले जात होते. एकवेळ त्यांनी घोषणा दिली होती की, 'वाघ म्हणून एक दिवस जगणं, शेळी बनून १००० वर्ष जगण्यापेक्षा चांगलं आहे'. हा वाघ ब्रिटीश सरकारने प्रतिबंधीत निर्यात यादीत ठेवल्याने ब्रिटनच्या एखाद्या गॅलरी किंवा संस्थानला ही ऐतिहासिक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल.
ब्रिटनचे कला मंत्री लॉर्ड स्टीफन पार्किन्सन म्हणाले की, 'हा चमकदार मुकुट टीपू सुल्तानच्या शासनाची कहाणी दर्शवतो आणि आपल्याला आपल्या शाही इतिहासात घेऊन जातो. मला आशा आहे की, ब्रिटनचा एखादा खरेदीदार समोर येईल. जेणेकरून आपल्या भारतासोबतच्या इतिहासाबाबत अधिक जाणू शकेल'.