Coronavirus : कधी येऊ शकतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? वैज्ञानिकांनी केला याबाबत खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 04:22 PM2021-06-21T16:22:45+5:302021-06-21T16:25:31+5:30
सिन्हुआच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये यावर्षी हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट सक्रिय होईल.
कोरोना व्हायरसची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरली नसतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता ब्रिटनला सतावत आहे. असं मानलं जात आहे की, कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) या हिवाळ्यात येऊ शकते. ज्यामुळे जगभरातील सरकारांना पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते.
अडचणींचा ठरू शकतो हिवाळा
सिन्हुआच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये यावर्षी हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट सक्रिय होईल. अशात ब्रिटनमध्ये यावर्षी हिवाळ्याच्या सीझनमध्ये लोकांना फार समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रिपोर्टनुसार यावर्षीच्या शेवटी लहान मुले आणि वयोवृद्ध मोठ्या संख्येने या व्हायरसचे शिकार होऊ शकतात. (हे पण वाचा : दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी)
देशात लागू शकतो लॉकडाऊन
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ब्रिटिश सरकारची सल्लागार संस्था, सायंटिफिक अॅडव्हायजरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने हा इशारा दिला आहे. SAGE चे सदस्य प्राध्यापक कॅलन सॅम्पल म्हणाले की, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरस डोकं वर काढण्याची चिंता वाढू शकते. ज्यामुळे देशात लॉकडाऊनही लावला जाऊ शकतो.
कॅलम म्हणाले की, 'मला वाटतं की, कोरोनामुळे हिवाळा फारच घातक ठरणार आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. मला वाटतं की, पुढील वर्षी सामान्य रूपाने व्यापार केला जाऊ शकेल'.
व्हायरससोबत लढू शकतो
पब्लिक हेल्थ इंग्लंडचे निर्देशन सुसान हॉपकिंस यांनी याबाबत इशारा जारी केला आहे. ते म्हणाले की, 'कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आम्हाला या हिवाळ्यात लॉकडाऊन लावावा जाऊ शकतो. असं असलं तरी आमच्याकडे या व्हेरिएंटसोबत लढण्यासाठी कोरोना वॅक्सीन टेस्टिंग आणि दुसरे उपचार असतील. ज्यांद्वारे आम्ही या व्हायरससोबत लढू शकतो.