UK : पंतप्रधान जॉन्सन यांनी कोरोना व्हायरससाठी चीनला धरलं जबाबदार; म्हणाले...
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 12, 2021 11:48 PM2021-01-12T23:48:00+5:302021-01-12T23:50:21+5:30
जागतीक नेत्यांसाठीच्या एका संबोधनात जॉन्सन बोलत होते. यावेळी त्यांनी, जे लोक अधिक 'क्षमते'साठी मोठ्या प्रमाणावर पँगोलिन्स मारतात, त्यांच्यावरही हल्ला चढवला.
लंडन -इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चीनविरोधात मोर्चा उघडला आहे. संपूर्ण जगात जीवघेणा कोरोना व्हायरस पसरण्यास चीनच जबाबदार आहे, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. जॉन्सन म्हणाले, चीनमध्ये होणाऱ्या विकृत मेडिकल प्रॅक्टिस (चिकित्सा अभ्यास) मुळेच कोरोना व्हायरस जागतीक महामारीचा प्रसार झाला आहे.
जागतीक नेत्यांसाठीच्या एका संबोधनात जॉन्सन बोलत होते. यावेळी त्यांनी, जे लोक अधिक 'क्षमते'साठी मोठ्या प्रमाणावर पँगोलिन्स मारतात, त्यांच्यावरही हल्ला चढवला. इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन यांनी हे वक्तव्य फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या, 'वन प्लॅनेट सम्मेलनात' दिलेल्या आपल्या भाषणातून दिली.
पँगोलिनची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. व्हायरस वटवाघळांपासून मानवापर्यंत पोहोचवण्यात पँगोलिनला जबाबदार धरले जाते. कोविड-19 चा पहिला रुग्ण चीनमधील वुहानमध्ये आढळून आला होता. पँगोलिनची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. व्हायरस वटवाघळांपासून मानवापर्यंत पोहोचवण्यात पँगोलिनला जबाबदार धरले जाते. कोविड-19 चा पहिला रुग्ण चीनमधील वुहानमध्ये आढळून आला होता. वुहान शहरातील पशू बाजारात विविध प्रकारची जनावरे असतात, यांनाच कोरोनासाठी जबाबदार धरले होते.
'प्रकृतीचे रक्षण करणे महत्वाचे -
बोरिस जॉन्सन म्हणाले, 'हे अगदी बोरोबर आहे, की हवामान बदलावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणता यायला हवे. आपण जोवर निसर्गाची सुरक्षितता निश्चित करत नाही, तोवर आपण योग्य प्रकारचे संतुलित होऊ शकत नाही, असेही जॉन्सन म्हणाले.
चीनचं उत्तर अंदाज बांधू नका -
जॉन्सन म्हणाले, हे मनुष्य आणि निसर्ग यांच्यात झालेल्या संघर्षामुळे झाले आहे आणि आपल्याला हे थांबवावेच लागेल. जॉन्सन यांच्या या वक्तव्यावर चीननेही नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता, झाओ लिजियान म्हणाले, की 'आम्ही अनेक वेळा सांगितले आहे, की व्हायरसच्या उत्पत्तीचा तपास लावणे ही वैज्ञानिक बाब आहे.
लिजियान इंग्लंडला इशारादेत म्हणाले, 'अंदाजा लवण्यासाठी येथे कसल्याही प्रकारची जागा नाही. अन्यथा याचा आंतरराष्ट्रीय सहकार्यावर परिणाम होईल.' इंग्लंड आणि चीन यांच्यात सुरू झालेले हे शाब्दिक युद्ध, चीनचे संबंध अमेरिकेपाठोपाठ इंग्लंड सोबतही खराब करू शकते.