10 वर्षांपासून घराखाली होता खजिना; एका झटक्यात दाम्पत्य झाले करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 11:20 AM2022-09-03T11:20:36+5:302022-09-03T11:21:46+5:30

gold coins : या सापडलेल्या नाण्यांची आता लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. 

uk treasure was hidden under the house for 10 years gold coins worth 23 million were found in one stroke | 10 वर्षांपासून घराखाली होता खजिना; एका झटक्यात दाम्पत्य झाले करोडपती!

(file photo)

Next

लंडन : ब्रिटनमध्ये एक दाम्पत्य रातोरात करोडपती बनले आहे. एका दिवसात ते इतके श्रीमंत होतील, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. हे दाम्पत्य आपल्या घराच्या दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी त्यांना घरात सोन्याची नाणी सापडली आहेत. द टाइम्सच्या वृत्तानुसार, ब्रिटिश दाम्पत्याला स्वयंपाकघरातील मजल्याखाली 264 सोन्याच्या नाण्यांचा साठा सापडला. हे दाम्पत्य नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहते. या प्राचीन नाण्यांची किंमत 250,000 पौंड म्हणजेच 2.3 कोटी रुपये एवढी आहे. या सापडलेल्या नाण्यांची आता लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. 

हे दाम्पत्य 10 वर्षांपासून या घरात राहत होते, पण आपल्या घराखाली करोडोचा खजिना दडलेला आहे, हेही त्यांना माहित नव्हते. हे दाम्पत्य आता स्पिंक अँड सनच्या माध्यमातून लिलावाद्वारे हा खजिना विकण्याची तयारी करत आहे. सोन्याच्या नाण्यांचा साठा 400 वर्षांहून जुना आहे आणि 2019 मध्ये शोधला होता. दुरुस्तीच्या वेळी स्वयंपाकघरातील फरशी काढल्यावर या दाम्पत्याला ही नाणी मिळाली. नाण्यांचा साठा एका धातूच्या आत सापडला, जो कॉंक्रिटखाली फक्त सहा इंच गाडला होता.

या दाम्पत्याला सुरुवातीला वाटले की, त्यांनी विजेच्या केबलवर हिट केले आहे. परंतु जेव्हा त्यांनी फरशी उचलली तेव्हा त्यांना एका कपमध्ये नाण्यांचा ढीग दिसला. कप कोकच्या बाटलीसारखे होते. दरम्यान, रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, जेव्हा दाम्पत्याने ते बाहेर काढले आणि पाहिले तेव्हा त्यांना कळले की ही नाणी 1610 ते 1727 इसवी मधील आहेत. ही नाणी जेम्स आणि चार्ल्स यांच्या राजवटीची आहेत. तेव्हा ही काही थोर व्यक्तीची मालमत्ता असावी, जी त्याच्या घराखाली पुरली गेली असावी, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, अचानक सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांमुळे दाम्पत्य श्रीमंत झाले आहे. स्पिंक अँड सनचे ग्रेगरी एडमंड म्हणाले की 'सार्वजनिक बाजारपेठेत या सोन्याच्या नाण्यांची किंमत किती आहे, हे पाहणे रोमांचक असेल. एका वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी सोन्याच्या नाण्यांचा लिलाव करण्याचा विचार मी कधीच केला नव्हता."

Web Title: uk treasure was hidden under the house for 10 years gold coins worth 23 million were found in one stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.