आर्मीत १४ वर्ष सेवा देणाऱ्या महिलेवर आली सेक्स वर्कर बनण्याची वेळ, मिळाले होते अनेक अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 12:16 PM2022-05-09T12:16:54+5:302022-05-09T12:19:58+5:30

ब्रिटनच्या शेफील्डमध्ये राहणारी ग्रेसने आर्मीत १४ वर्ष सेवा दिली. यादरम्यान तिला बेस्ट रिक्रूटचा अवॉर्डही मिळाला होता.

UK : War hero served in Iraq and Afghanistan turned into sex worker | आर्मीत १४ वर्ष सेवा देणाऱ्या महिलेवर आली सेक्स वर्कर बनण्याची वेळ, मिळाले होते अनेक अवॉर्ड

आर्मीत १४ वर्ष सेवा देणाऱ्या महिलेवर आली सेक्स वर्कर बनण्याची वेळ, मिळाले होते अनेक अवॉर्ड

googlenewsNext

एका महिलासैनिकाला युद्धाचा असा धक्का बसला की, सेनेने तिला डिस्चार्ज केलं. आता ही वॉर हिरो एक सेक्स वर्कर म्हणून काम करत आहे. ग्रेस पार्कर असं या ३५ वर्षीय महिलासैनिकाचं नाव आहे. ती इराक आणि अफगाणिस्तानमध्ये सेवेत होती. पण २०१९ मध्ये Posttraumatic Stress Disorder आणि डिप्रेशनने पीडित झाल्यावर तिला मेडिकल डिस्चार्ज देण्यात आला. यादरम्यान ती पूर्णपणे बिथरली होती आणि बेघर झाली होती.

ग्रेसने द सनसोबत बोलताना सांगितलं की, मी कुणालाही दोषी मानत नाही. मी माझी स्वत:ची चॉइस आहे. पण जेव्हा मी डिस्चार्ज झाली होती, त्यावेळी आर्मीबाबत माझ्या मनात राग होता. मला असं वाटलं की, मी केवळ एक नंबर होते. रॉयल इंजिनिअर्स विभागात फार जास्त महिला नव्हत्या. मी खूपकाही मिळवलं. पण मला जाणीव झाली की, मी काहीच नाहीये.

ब्रिटनच्या शेफील्डमध्ये राहणारी ग्रेसने आर्मीत १४ वर्ष सेवा दिली. यादरम्यान तिला बेस्ट रिक्रूटचा अवॉर्डही मिळाला होता. ती इराकमध्ये करण्यात आलेल्या ऑपरेशन शेडरचा भाग होती. त्यावेळी रॉयल इंजिनिअर्ससोबत चांगलं काम केल्यामुळे तिला कमेंडेशन देण्यात आलं होतं.

२००९ मध्ये तिची पोस्टिंग अफगाणिस्तानमध्ये करण्यात आली होती. यादरम्यान ती एका अशा कॅम्पमध्ये होती जिथे सामान्यपणे जिहादी हल्ला करत होते. ती तिथे ६ महिने राहिली. ग्रेस म्हणाली की, मला २०१९ मध्ये सॅंक्शन करण्यात आलं होतं. मला पूर्ण सन्मानासोबत डिस्चार्ज करण्यात आलं होतं. 

यानंतर माझं लग्न मोडलं आणि मी एकटी पडले. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली आणि सोबतच ती नर्सिंगचं शिक्षण घेऊ लागली. पण मग कोविड दरम्यान ती आईसोबत रहायला गेली. ग्रेस म्हणाली की, मी फार अडचणीत होते आणि मला माहीत नव्हतं की काय करावं. मला पैशांची गरज होती. त्यामुळे नाइलाजाने मी सेक्स वर्कर झाले. सर्वातआधी डेटिंग साइटवर एका पुरूषाने मला यासाठी विचारलं आणि मी हो म्हणाले.
 

Web Title: UK : War hero served in Iraq and Afghanistan turned into sex worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.