पत्नी आणि केअरटेकरचं अफेअर, दिव्यांग पतीला ठेवलं उपाशी; बनवलं गुलाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 09:45 IST2023-07-19T09:43:08+5:302023-07-19T09:45:55+5:30
या गुन्ह्यात तिची साथ तिच्या बॉयफ्रेंडने दिली, जो महिलेच्या पतीचा केअरटेकर होता. आता दोघांनाही 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पत्नी आणि केअरटेकरचं अफेअर, दिव्यांग पतीला ठेवलं उपाशी; बनवलं गुलाम!
अनैतिक संबंधाच्या अनेक धक्कादायक घटना नेहमीच समोर येत असतात. कधी महिला पतींना दगा देतात तर कधी पुरूष. पण एक फारच हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून आपल्या दिव्यांग पतीला बंदी बनवलं आणि त्याला त्रास दिला. तिने पतीला 2016 ते 2020 दरम्यान गुलाम बनवून ठेवलं आणि उपाशीही ठेवलं. या गुन्ह्यात तिची साथ तिच्या बॉयफ्रेंडने दिली, जो महिलेच्या पतीचा केअरटेकर होता. आता दोघांनाही 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
49 वर्षीय आरोपी महिलेचं नाव मसरसेट-होउ आहे तर तिच्या बॉयफ्रेंडचं नाव जियॉर्ज वेब असून तो 40 वर्षांचा आहे. इंडिपेटंड यूकेच्या रिपोर्टनुसार, दोघांनाही टॉम समरसेट नावाच्या व्यक्तीला गुलाम बनवून त्रास देण्यात दोषी ठरवलं आहे. नुकताच याबाबत कोर्टात निर्णय देण्यात आला. जियॉर्ज वेबबाबत पीडित टॉम म्हणाला की, त्याचा राग एखाद्या परमाणु बॉम्बसारखा आहे. त्यांनी टॉमला शारीरिक नुकसानही पोहोचवलं. टॉम दिव्यांग आहे. त्याला बेडवरच रहावं लागत होतं. सोबतच त्याला खायलाही काही दिलं जात नव्हतं. हे प्रकरण बाहेर आणण्याचं काम टॉमच्या मित्राने आणि बहिणीने केलं.
टॉम म्हणाला की, त्याला समजलं की, त्याची पत्नी वेबने पाच वर्ष त्याला त्रास देण्याचा प्लान केला होता. तो पत्नी साराबाबत म्हणाला की, ती सतत त्रास देत होती. तो आता कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. टॉम म्हणाला की, साराला भेटण्याआधी त्याचं करिअर चांगलं होतं. मी सिनेमाला आणि पबमध्येही जात होतो. माझे मित्र होते. माझं आयुष्य छान सुरू होतं. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा सगळ्या गोष्टी सोबत करत होतो. पण जेव्हा जेव्हा वेबची एन्ट्री आमच्या आयुष्यात झाली तेव्हा सगळं काही बदललं. आता टॉम एका केअर होममध्ये राहत आहे.
जज विलिअम एशवर्थ यांनी याप्रकरणी सांगितलं की, हे आढळून आलं आहे की, कशाप्रकारे टॉमला 2 वर्ष 8 महिने वाईट स्थितीत ठेवण्यात आलं. त्याला जेवण आणि पाणीही दिलं गेलं नाही. तो बाथरूमला जाण्यासाठी विनवण्या करत होता. तो बेडवर राहत होता. त्याला स्वच्छतेत ठेवलं जात नव्हतं. बेडवर तो नैसर्गिक क्रिया करत होता. टॉमला परिवारापासून दूर ठेवण्यात आलं. 2020 मध्ये त्याच्या परिवारानेच याचा खुलासा केला. त्यानंतर याची चौकशी करण्यात आली.