टॉयलेट सीटवर बसल्यावर महिलेला दिसला 'मृत्यू', वेदनेने किंचाळत पोहोचली हॉस्पिटलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 03:56 PM2021-11-03T15:56:49+5:302021-11-03T16:06:29+5:30

Spider Bites Woman In Toilet : महिलेला कोळ्याने चावा घेतल्यावर एका आठवड्यात तीन वेळा हॉस्पिटलमद्ये दाखल करावं लागलं. कोळ्याने महिलेच्या मांडीला चावा घेतला होता.

UK : Woman rushed to hospital after poisonous spider bites hiding in toilet seat | टॉयलेट सीटवर बसल्यावर महिलेला दिसला 'मृत्यू', वेदनेने किंचाळत पोहोचली हॉस्पिटलमध्ये

टॉयलेट सीटवर बसल्यावर महिलेला दिसला 'मृत्यू', वेदनेने किंचाळत पोहोचली हॉस्पिटलमध्ये

googlenewsNext

बरेच लोक टॉयलेट सीट चेक न करताच वापर करतात. पण असं करणं अनेकांना महागात पडतं. याचंच एक उदाहरण समोर आलं आहे. अनेकदा टॉयलेट सीटमध्ये साप लपलेले आढळून येतात. अशा घटना जास्तकरून ऑस्ट्रेलियात आढळून येतात. पण काही दिवसांपूर्वी यूके (UK)मध्ये एका महिलेने चेक न करता टॉयलेट सीटचा वापर केला. पण तिला काय माहीत होतं की, सीट खाली एक विषारी कोळी (Spider Bites Woman In Toilet) लपला आहे. बसल्यावर लगेच महिला वेदनेने किंचाळली आणि ओरडतच हॉस्पिटलमध्ये गेली.

महिलेला कोळ्याने चावा घेतल्यावर एका आठवड्यात तीन वेळा हॉस्पिटलमद्ये दाखल करावं लागलं. कोळ्याने महिलेच्या मांडीला चावा घेतला होता. हा कोळी सीटखाली लपून होता. कोळ्याच्या चाव्यामुळे महिलेच्या मांडीवर मोठी जखम झाली. असं सांगितलं जात आहे  की, कोळी फॉल्स विडो होती. हा कोळी फार विषारी आहे. व्यवसायाने रेडीओ प्रोड्यूसरला आठवड्यातून तीन वेळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. 

३४ वर्षीय महिलेने सांगितलं की, डॉक्टरांनुसार, जर ती वेळीच हॉस्पिटलमध्ये आली नसती तर कदाचित तिचा जीवही गेला असता. कोळ्याने चावा घेतल्यानंतर महिलेला जोरात वेदना होत होती. महिलेने सांगितलं की, आता तिची जखमी ठीक झाली आहे. पण अजूनही तिला बसण्या-उठण्यात समस्या होते. लीड्समध्ये राहणाऱ्या ज्यो हिला कोळ्यांची फार भीती वाटते. आता तर तिच्या मनात अजून जास्त भीती बसली आहे. घटनेबाबत सांगताना ती म्हणाली की, ती सकाळी अर्ध्या झोपेतच बाथरूममध्ये आली होती. तिने केवळ सीटचं कव्हर उचललं आणि बसली. तेव्हा तिला जोरात वेदना झाली. 

ओरडत उठून पाहिलं तर तिला सीटवर एक कोळी चालत असल्याचं दिसलं. त्याच कोळ्याने तिला चावा घेतला होता. ती वेदनांनी किंचाळतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिथे काही औषधे घेतल्यावरच तिला आराम मिळाला. पण जळजळ होतच राहिली. डॉक्टरांनुसार, जर वेळेवर ती हॉस्पिटलमध्ये आली नसती तर तिचा मृत्यू झाला असता.
 

Read in English

Web Title: UK : Woman rushed to hospital after poisonous spider bites hiding in toilet seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.