रशियासोबतच्या युद्धामुळे झेलेन्स्की यांच्या अडचणी वाढल्या, ५ मंत्र्यांनी दिले राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:09 PM2024-09-04T12:09:05+5:302024-09-04T12:13:19+5:30
दोन उपपंतप्रधान आणि देशांतर्गत शस्त्रास्त्र उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या एका मंत्र्यासह पाच कॅबिनेट मंत्र्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सरकारमध्ये मोठ्या फेरबदलात राजीनामा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रशिया- युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. काही दिवसापूर्वी रशियात युक्रेनने हल्ला केला. आगीत रशियाचे हवाई तळ आणि नौदल तळ जळत आहेत. त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. युक्रेनमध्ये अंतर्गत भूकंप झाला आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या पाच मंत्र्यांनी एकत्र राजीनामा दिला, या मंत्र्यांनी राजीनामा का दिला याची माहिती समोर आलेली नाही.
या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान अमेरिकेने केले जप्त, कारण काय?
राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये उपपंतप्रधान ओल्हा स्टेफानिशिना, धोरणात्मक उद्योग मंत्री अलेक्झांडर कामिशिन, न्याय मंत्री डेनिस मलियुष्का, पर्यावरण मंत्री रुस्तालन स्ट्रीलेट्स आणि पुनर्मिलन मंत्री इरिना वेरेशचुक यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राज्य मालमत्ता निधी प्रमुख विटाली कोवल यांनीही पदभार स्वीकारल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा दिला.
संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे की झेलेन्स्कीला अनेक क्षेत्रांमध्ये नुकसान होत आहे. युद्धात त्यांना धक्का बसत आहे. झेलेन्स्की यांच्या सैन्याला कुर्स्क आणि इतर सीमा प्रांतात पराभवाचा सामना करावा लागत आहे. हा पराभव टाळण्यासाठी युक्रेनच्या सैन्याने आता रशियन भूमीवर हल्ले तीव्र केले आहेत. याशिवाय गेल्या ३ दिवसांत रशियाने युक्रेनमध्ये ज्याप्रकारे दहशत माजवली आहे, त्यानंतर झेलेन्स्की यांचे सैन्यही प्रत्युत्तराच्या मोडमध्ये आले आहे. Tver आणि Crimea मध्ये युक्रेनचा हल्ला हा त्याचाच परिणाम आहे.
युक्रेनचे सैन्य रशियाच्या आत आणि युद्धभूमीवर भयंकर हल्ले करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियातील कॅलिनिनग्राडमध्येही युक्रेनने विनाशकारी हल्ला केला. स्फोटानंतर कॅलिनिनग्राडच्या निवासी भागात आग लागली. युक्रेनने नीपर नदीत अर्धा डझन रशियन नौका बुडवल्या. युक्रेनियन सैन्याने डोनेस्तकमधील दोन रशियन तळांचे अस्तित्व पुसून टाकले. युक्रेनने डोनेस्तकच्या क्रास्नोहोरिव्हका येथे रशियन सैन्याचा स्तंभ नष्ट केला.
युक्रेनला आवश्यक शस्त्रे मिळाल्यावरच पराभव टाळता येईल. झेलेन्स्की यांना हे माहित आहे, म्हणूनच ते अनेक देशांकडून शस्त्रांची मागणी करत आहे. या संदर्भात झेलेन्स्की यांनी नेदरलँडच्या पंतप्रधानांची भेट घेतली. नेदरलँडकडून हवाई संरक्षण यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांची मागणी करण्यात आली होती.